Saturday, April 18, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा शिवजन्मोत्सव समितीतर्फे भव्य अपघात विमा व बँक खाते नोंदणी शिबिराचे आयोजन..

कोंढाळा शिवजन्मोत्सव समितीतर्फे भव्य अपघात विमा व बँक खाते नोंदणी शिबिराचे आयोजन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(गडचिरोली):-रयतेचे राजे श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून शिवजन्मोत्सव समिती कोंढाळाच्या वतीने गावात विविध उपक्रमांची रेलचेल सुरू आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा नुकतीच संपन्न झाली असून वेशभूषा स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,वकृत्व स्पर्धा,सिंह गर्जना तसेच विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिवबाची प्रेरणा अंगीकारणे सुरू असतांनाच शिवजन्मोत्सव समितीने यंदाच्या गुरुवार १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच बुधवार १८ फेब्रुवारी रोजी गावातील ग्रामस्थांसाठी समितीच्या वतीने भव्य अपघात विमा व बँक खाते नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरात “कोंढाळावासीयांना २ लाखांचे सुरक्षा कवच” असे ब्रीद मनी बाळगून कोंढाळा गावातील प्रत्येक नागरिकाला आणि विद्यार्थ्याला आर्थिक सुरक्षा मिळावी, या उदात्त हेतूने शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने भव्य अपघात विमा व बँक खाते नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सदर शिबिर हे येत्या,बुधवार१८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजेपासून ते दुपारी २ वाजेपर्यंत श्री दत्त मंदिर परिसराच्या आवारात करण्यात आले आहे.यात २ लाख रुपयांचा अपघात विमा कवच, ज्यांचे पोस्टात खाते नाहीत,अश्यांचे खाते तात्काळ उघडून दिले जाईल.१० वर्षावरील आणि १० वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी विशेष खाते सुविधा.यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे नागरिकांसाठी अपघात विम्यासाठी आधार कार्ड झेरॉक्स,दोन फोटो,पॅनकार्ड (नसल्यास ६ महिन्यात देणे),जॉब कार्ड झेरॉक्स इत्यादी.तसेच १० वर्षांवरील विद्यार्थ्यांसाठी स्वतःचे आधार कार्ड,पालकांचे आधार कार्ड व मोबाईल नंबर,तर १० वर्षाखालील यांचेसाठी आधार कार्ड झेरॉक्स, जन्मदाखला/टीसी झेरॉक्स,दोन फोटो,बोनाफाईड, पालकांचे आधार कार्ड व पॅनकार्ड.विमा सुविधेसाठी पोस्टाचे खाते असणे अनिवार्य आहे.ज्यांचे खाते नाही, अश्यांना शिबिराच्या ठिकाणीच नवीन खाते उघडून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. “आपली सुरक्षा,आमचा ध्यास.! कोंढाळावासीय जनतेनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.” असे आवाहन शिवजन्मोत्सव समिती कोंढाळाच्या वतीने करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहितीकरिता सूरज झिलपे यांच्याशी संपर्क साधावा.
संपर्क क्रमांक– 93707 88209
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!