Saturday, August 29, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर "जयंती महोत्सव".....

कोंढाळा येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर “जयंती महोत्सव”.. – उद्याला सुप्रसिद्ध गायिका अंजली भारती यांचा समाज प्रबोधनपर कार्यक्रम..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(गडचिरोली):-क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथे उद्या,शनिवार ११ एप्रिलपासून ते मंगळवार १४ एप्रिल पर्यंत “जयंती महोत्सव” साजरा करण्यात येत आहे.त्या निमित्ताने आम्रपाली बौद्ध महिला मंडळ,प्रशिक क्रीडा मंडळ तथा युवा मंच तसेच समता सैनिक दल कोंढाळा यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या, शनिवारला सकाळी ९ वाजता राहुल बौद्ध विहारात बौद्ध अनुयायांच्या उपस्थितीत बुध्दवंदना, सकाळी १० वाजता भिमज्योत प्रारंभ व रात्री ७ वाजेच्या सुमारास मनोजकुमार रामटेके यांच्या भव्य आवारात महाराष्ट्राची सुप्रसिद्ध गायिका अंजली भारती यांचा समाज प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.त्यानंतर,दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवार,१२ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता बुध्दवंदना, सकाळी १० वाजता समता सैनिक दल यांचे पथ संचलन,दुपारी २ ते ३ वाजता संगीत खुर्ची,वकृत्व स्पर्धा,महिलांसाठी फुगे फोड स्पर्धा,सोमवार १३ एप्रिल रोजी सकाळी बुध्दवंदना व रात्री ९ वाजता भिमस्फूर्ती गायन मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम,तर मंगळवार १४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता बुध्दवंदना,सकाळी १० वाजता ध्वजारोहन कार्यक्रम, सायंकाळी ४ ते ८ वाजता धम्मज्योत मिरवणुक व भोजनदान व रात्रौ ११ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम,अशी कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
  • कोण आहेत अंजली भारती👇
उद्याला अंजली भारती यांचा देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथे समाज प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.अंजली भारती या महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध विद्रोही गायिका आणि भीमगायिका म्हणून ओळखल्या जातात.त्या मूळच्या नांदेड जिल्ह्यातील डोलरी तालुक्यातील आहेत.आंबेडकरी चळवळीतील गाणी आणि टोकदार भाषेतील भाषणांमुळे त्या विशेषतः तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत.त्यांना अनेकदा ‘दीदी अंजली भारती’ किंवा ‘भीम कन्या’ असेही म्हटले जाते. त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित शेकडो भीमगीते गायली आहेत.केवळ महाराष्ट्रच नाही,तर उत्तर भारतातही(बिहार,युपी)त्यांची भोजपुरी आणि मगही भाषेतील गाणी प्रसिद्ध आहेत.त्यांच्या ‘दीदी अंजली भारती’ नावाच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर साधारण सहा लाख सबस्क्रायबर्स आहेत.त्यांनी आतापर्यंत दीड हजार पेक्षा जास्त व्हिडिओ अपलोड केले आहेत.त्यातच,इन्स्टाग्रामवर त्यांचे सुमारे साडे चार लाख फॉलोअर्स आहेत. ‘भीमाची वाघिण’, ‘आमचा मोडक तोडक घर’, ‘निळा झेंडा रे’ ही त्यांची गाणी यूट्यूबवर दशलक्षाहून अधिकवेळा पाहिली गेली आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!