- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरला औरंगजेबाची कबर हटाव मोहिमे अंतर्गत पहिल्यांदाच गालबोट लागले आहे.बाबरी पाडण्याच्या वेळी शांत राहिलेल्या नागपूरमध्ये सोमवारी १७ मार्च २०२५ रोजी औरंगजेबाची कबर पाडण्याच्या मागणीसाठी दंगल उसळली.विश्व हिंदू परिषदेच्या आणि बजरंग दलाच्या निदर्शनांमध्ये कुराणातील आयती जाळल्याची अफवा पसरली अन् दंगल उसळली.
ज्या महाल भागात आरएसएसचे मुख्यालय आहे त्याच भागातून हिंसाचार सुरू झाला.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाल परिसरातून आमदार आहेत.दंगल उसळीत जमावाने उभ्या वाहनांना आग लावली,घरांची तोडफोड केली आणि पोलिसांवरही हल्ला केला.यामध्ये ३ डीसीपींसह ३३ पोलिस जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ११ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू(संचारबंदी) लागू करण्यात आला आहे. हिंसाचारग्रस्त भागात पोलिस ध्वज मार्च काढत आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल हे या हिंसाचाराला सुनियोजित कट म्हणत आहेत. फडणवीसांच्या मते,व्हॉट्सॲपवर व्हिडिओ व्हायरल करून लोकांना गोळा करण्यात आले.यातर हिंसाचार झाला.हिंसाचाराच्या वेळी हाणामारीसह रात्रीच्या सुमारास एका महिला पोलिस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला गेला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी सांगितली.जिकडे-तिकडे सळो की पळो अशी परिस्थिती निर्माण झाली होती.पहिल्यांदा उपराजधानीला गालबोट लागल्याने सगळीकडे वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
- Advertisement -

