Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीकुरखेडाच्या नान्ही रेतीघाटातील अवैध वाळू उत्खनन प्रकरण भोवणार.. - जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवर..

कुरखेडाच्या नान्ही रेतीघाटातील अवैध वाळू उत्खनन प्रकरण भोवणार.. – जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-कुरखेडा उपविभागांतर्गत येणाऱ्या नान्ही रेतीघाटात नियमांचे उल्लंघन करून अवैध वाळू उत्खनन झाल्याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी सहा सदस्यीय उच्चस्तरीय समितीची नियुक्ती केली आहे व सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
सन २०२५-२६ या वर्षासाठी कुरखेडा उपविभागातील नान्ही आणि कुंभीटोला या रेतीघाटांचा ई-लिलाव करण्यात आला होता.यामध्ये देवरी येथील ‘तारामंगल एजन्सी’ यांनी सर्वोच्च बोली लावून हे रेतीघाट मिळवले होते.जिल्हाधिकारी कार्यालयाने ११ डिसेंबर २०२५ रोजी यासंदर्भात मंजुरीचा आदेशही निर्गमित केला होता.परंतु, या आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले होते की,अटी व शर्तींचा करारनामा तसेच EMP आणि CER बाबतचे हमीपत्र सादर केल्यानंतरच प्रत्यक्ष उत्खननास सुरुवात करता येईल.तरीही,कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच नान्ही रेतीघाटातून अंदाजे ६०० ब्रास रेतीचे उत्खनन करण्यात आल्याचे तहसीलदार कुरखेडा यांच्या अहवालातून समोर आले आहे.
  • तक्रार आणि प्रशासकीय कारवाई👇
कुरखेडा येथील रहिवासी यांनी १५ डिसेंबर २०२५ रोजी नान्ही रेतीघाटातील अवैध उत्खननाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रार दाखल केली होती.तहसीलदारांच्या अहवालानुसार,उत्खनन केलेली रेती अद्याप घटनास्थळीच असून तिची वाहतूक झालेली नाही,असे म्हटले असले तरी,ठोस पुराव्याअभावी अवैध वाहतुकीची शक्यता नाकारता येत नसल्याचे प्रशासनाचे मत आहे.
  • अशी असेल चौकशी समिती👇
या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी खालील अधिकाऱ्यांची समिती गठीत केली आहे:
अध्यक्ष: सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी,गडचिरोली.
सह-अध्यक्ष: सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी,एटापल्ली.
सदस्य: कार्यकारी अभियंता(सा.बां.विभाग), उपअधीक्षक(भूमी अभिलेख)आणि सहाय्यक जिल्हा खनिकर्म अधिकारी.
सदस्य सचिव: तहसीलदार,धानोरा.
सदर समितीला प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करून, वस्तुनिष्ठ तपासणी करून आपला स्वयंस्पष्ट अभिप्राय सात दिवसांच्या आत सादर करण्याच्या सूचना दिल्या  आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!