Wednesday, April 15, 2026
Homeगडचिरोलीकुरखेडाच्या गुरनोली व घाटी रेती वितरण प्रकरणात चौकशी समिती नियुक्त

कुरखेडाच्या गुरनोली व घाटी रेती वितरण प्रकरणात चौकशी समिती नियुक्त

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील राखीव रेतीघाटांमधून घरकुल लाभार्थ्यांसाठी आरक्षित असलेली रेती खाजगी कंत्राटदारांना पुरवण्यात आल्याच्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष चौकशी समितीची नियुक्ती केली आहे.
कुरखेडा तालुक्याच्या गुरनोली आणि घाटी येथील रेतीघाटांमधून घरकुल लाभार्थ्यांची रेती नियमबाह्यरीत्या खाजगी कंत्राटदारांना दिल्याबाबत माध्यमातून वृत्त प्रकाशित झाले होते.या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी समिती गठीत केली असून,या समितीच्या अहवालानुसार जे कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल,असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
  • ‘महाखनिज’ प्रणालीत तांत्रिक बदल👇
भविष्यात अशा प्रकारच्या अनियंत्रित रेती उपशाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने तांत्रिक पावलेही उचलली आहेत.गडचिरोली जिल्ह्यातील राखीव रेतीघाटांमधून स्थानिक रहिवासी (वैयक्तिक वापर)आणि घरकुल लाभार्थी यांच्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही शासकीय प्रकल्पांसाठी किंवा कामांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व मान्यतेशिवाय वाळू उपलब्ध होऊ नये,यासाठी ‘महाखनिज’ प्रणालीमध्ये आवश्यक बदल करण्याचे निर्देश मे.शौर्या टेक्नोसॉफ्ट प्रा.लि.पुणे यांना देण्यात आले आहेत.
  • आतापर्यंतचे रेती वितरण आणि सद्यस्थिती👇
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार,आतापर्यंत जिल्ह्यातील हजारो लाभार्थ्यांना रेतीचा पुरवठा करण्यात आला आहे:
स्थानिक रहिवासी : जिल्ह्यातील १ हजार ७७१  स्थानिक रहिवाशांना त्यांच्या वैयक्तिक वापरासाठी एकूण १४ हजार २४६ ब्रास वाळू उपलब्ध करून देण्यात आली आहे.
घरकुल लाभार्थी : एकूण ३२ हजार १२९ घरकुल लाभार्थ्यांना आतापर्यंत १ लाख ६१ हजार ३२० ब्रास वाळूचा पुरवठा करण्यात आला आहे.
सध्याच्या नियमांनुसार,स्थानिक वापरासाठी ६०० रुपये स्वामित्वधन व इतर रकमांचा भरणा करून वाळू दिली जात आहे.तसेच,घरकुल लाभार्थ्यांना कमाल ५ ब्रासपर्यंत वाळू विनामूल्य वितरित केली जात असून,ही प्रक्रिया जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांच्या स्तरावरून सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!