Saturday, August 8, 2026
Homeजळगावकालच तक्रार झाली अन् आजच अडकले जाळ्यात..! - लाच प्रकरणी ग्रामसेवक व...

कालच तक्रार झाली अन् आजच अडकले जाळ्यात..! – लाच प्रकरणी ग्रामसेवक व रोजगार सेवकास रंगेहाथ अटक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
जळगाव :-गोर-गरीबांसह सर्वसामान्य नागरिकांना  हक्काचे घर मिळावे,यासाठी शासन स्तरावरून आर्थिक सहाय्य म्हणून घरकुल बांधकामासाठी दीड लाख रुपये दिले जातात.एवढ्या तुटपुंज्या रकमेत घर बांधकाम होत नसतांनाही काहीजण सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काच्या रकमेवर नजर ठेवून पैश्याची मागणी करीत असतात.त्यामुळे अश्यांना अद्दल घडावी,यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दणका दिला जातो आहे.अश्यातही काहीजण आपल्या सवियी सोडण्यास तयार नसल्याचा प्रकार आज,मंगळवार २४ जून रोजी जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील मांडकी येथे उघडकीस आला आहे.विशेष म्हणजे,ग्रामसेवक आणि रोजगार सेवकाने काल,सोमवार २३ जून रोजी तक्रारदारास सहा हजार रुपयांची मागणी केली.त्यानुसार तक्रारदाराने कालच तक्रार केली आणि आज,मंगळवार २४ जून रोजी पडताळणीसह तडजोडीनंतर पाच हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविणाऱ्या ग्रामसेवक आणि रोजगार सेवकाला पंचासमक्ष लाच स्वीकारतांना रंगेहाथ अटक करण्यात आल्याने दोघांनीही विचार केला नसेल की,आपला ‘चट मंगणी पट ब्याह’ होणार म्हणून.प्रकरणी भडगाव तालुक्याच्या मांडकी आणि अंतुरली बुद्रुक येथील ग्रामसेवक सोनिराम धनराज शिरसाठ वय ४७ वर्षे व रोजगार सेवक जितेंद्र लक्ष्मण चौधरी वय ३८ वर्षे या दोघांनाही लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे.
तक्रारदाराला शासनाच्या घरकुल योजनेचा दुसऱ्या हप्त्याचा लाभ मंजूर झाल्याने दुसरा हप्ता आणि नमुना आठ मिळावा यासाठी तक्रारदाराने ग्रामसेवक व रोजगार सेवकाची भेट घेत घेतली.भेट घेताच दोघांनीही सहा हजार रुपये द्यावे लागतील,असे सांगितले.तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने काल,सोमवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.त्यानुसार तक्रार प्राप्त होताच आज मंगळवारी पडताळणी केली असता, दोन्ही आरोपींनी पंचासमक्ष तडजोडीनंतर पाच हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार सापळा रचून आरोपींना पंचासमक्ष लाच स्वीकारतांना रंगेहाथ अटक करण्यात आली असून दोन्ही आरोपींविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी (नंदुरबार) व तपास अधिकारी पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव (जळगाव सापळा पथक),पोलीस उपनिरीक्षक दिनेश सिंग पाटील,विलास पाटील,पोलीस नाईक हेमंत पाटील व सुभाष पावरा यांनी पार पाडली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकेकाळी ज्या भागात फडकायचे लाल,काळे झेंडे; आता पहिल्यांदाच फडकणार तिरंगा..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील नक्षलवादाची संपूर्ण मुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत उपटून फेकण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर करताच राज्याच्या विविध जिल्ह्यातील...

महागाईची झळ; दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीसह दूध विक्रीत होणार वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-अगोदरच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असतांनाच आता त्यात आणखी भर पडून दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांनी दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची...

गडचिरोलीची बदनामी करण्याचा डाव; नागरिकांनी तथ्य पडताळूनच माहिती शेअर करावी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांच्या स्थितीबाबत जुनी, वस्तुस्थितीशी विसंगत तसेच अन्य राज्यांतील छायाचित्रे गडचिरोलीतील असल्याचे भासवून...

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!