- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-बऱ्याच कालावधीपासून विविध प्रकरणांमुळे अहेरी नगरपंचायत नेहमी चर्चेत होती. नियमबाह्य निविदा प्रकरण,तत्कालीन मुख्याधिकारी दिनकर खोत यांच्या विरोधातील अट्रॉसिटी प्रकरण अशा विविध प्रकरणांमुळे अहेरी नगर पंचायतीतील सत्ताधारी गट चर्चेत होता.त्यातच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व सत्ताधाऱ्यांचे नेते अजय कंकडालवार यांनी अहेरी येथील वॉर्ड क्र.१० मध्ये नगर भूमापन क्र.७८० व ७६६ मधील सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करुन बेकायदेशीररित्या बांधकाम केले होते.अशातच नगर परिषद प्रशासनाने त्यांना अतिक्रमण काढून टाकण्याची नोटीसही बजावली होती.परंतु अहेरी नगरपंचायतीच्या ३ ऑक्टोंबर २०२२ रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत या बांधकामाला संरक्षण देणारा ठराव पारित करण्यात आला.या विरोधात भाजपच्या वॉर्ड क्र.१५ च्या नगरसेविका शालिनी संजय पोहनेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे डिसेंबर २०२२ मध्ये आक्षेप दाखल केला होता.त्यानुसार काल,मंगळवारी २४ डिसेंबर रोजी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी संजय दैने यांनी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांसह अन्य सात नगरसेवकांनी अनधिकृत बांधकामाला संरक्षण देण्याची भूमिका घेतल्याचा निष्कर्ष नोंदवून त्यांना अपात्र घोषित केले.यात नगराध्यक्षा रोजा करपेत, उपाध्यक्ष शैलेंद्र पटवर्धन,नगरसेविका सुरेखा गोडसेलवार,नौरास रियाज शेख,मीना ओंडरे, नगरसेवक विलास गलबले,विलास सिडाम व महेश बाकेवार अशी अपात्र ठरलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय दैने यांची नागपूर येथे बदली झाली असून त्यांनी आपल्या कार्यकाळाच्या अखेरच्या दिवशी नगर पंचायतीच्या ९ नगरसेवकांना अपात्र घोषित केल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरू लागला आहे.
- Advertisement -

