- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-एखादी कंपनी असो वा कुठलेही दुकान, हॉटेल,ढाबे,चहाची दुकाने वा इतर आस्थापनांमध्ये बालकांना कामावर ठेवणे गंभीर गुन्हा आहे.यात १४ वर्षे वयाखालील मुलांचा समावेश होतो.तर नव्या बाल व किशोरवयीन कामगार कायदा २०१६ च्या सुधारणेनुसार, १४ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांना धोकादायक उद्योगांमध्ये काम करण्यास बंदी असतांनाही नागपूरच्या बुटीबोरी एमआयडीसी परिसरातील नारायणा कारखान्यात धोकादायक परिस्थितीत बालकामगारांकडून काम करवून घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.प्रकरणी कारखान्यात काम करणाऱ्या तब्बल ९ बालकामगारांची सुटका करण्यात आली आहे.यात चार मुली आणि पाच मुलांचा समावेश आहे.प्रकरणी कारखान्याच्या संचालकांसह चार जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सामाजिक कार्यकर्ते राकेश भलावी यांनी तक्रार केल्यानंतर प्रशासन आणि बाल संरक्षण पथकाने तातडीने छापा टाकून ही कारवाई केली.छाप्यादरम्यान समोर आलेली माहिती धक्कादायक आहे.अल्पवयीन मुलांकडून फॅक्टरीमध्ये मोठ्या मशीनवर काम करून घेतले जात होते.तसेच,केमिकल आणि आरोग्यास घातक वातावरणात त्यांना काम करण्यास भाग पाडले जात होते,ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता होती.मुलांच्या राहण्याची व्यवस्थाही अत्यंत निकृष्ट आणि अस्वच्छ असल्याचे निदर्शनास आले.याशिवाय,बाहेरच्या राज्य आणि जिल्ह्यातील मुलांना आणून त्यांच्याकडून जबरदस्तीने काम करून घेतले जात असल्याचेही उघड झाले आहे.सदरची कारवाई बुटीबोरी पोलिसांच्या सहकार्याने पार पडली.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील मेसरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल मोरे,तक्रारदार राकेश भलावी,तसेच चाईल्ड लाईन प्रतिनिधी पूजा कांबळे, मेघा पाटील आणि ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टच्या रूपाली वानखेडे,अश्विनी चौरे यांचा सहभाग होता.
- Advertisement -

