Wednesday, June 3, 2026
Homeगडचिरोलीकायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी आदेश..

कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी आदेश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात दिनांक-२ डिसेंबर ते ८ डिसेंबर २०२४ या कालावधीत पी.एल.जी.ए.नक्षल सप्ताहाचे आयोजन तसेच दिनांक-६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात येणार आहे.याशिवाय काही विविध राजकीय पक्ष,संघटना व इतर नागरिक हे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे,मोर्चे,आंदोलने,सभा, मिरवणुक सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या दृष्टीने जिल्हा दंडाधिकारी संजय दैने यांनी संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यात दिनांक- २७ नोव्हेंबर २०२४ ते दिनांक-११ डिसेंबर २०२४ चे मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ चे कलम ३७ (१)(३) लागु करण्यात आलेले आहे.
सदर कालावधीत शस्त्र,सोटे,तलवारी,भाले,दंडे,बंदुका, सुरे,काठ्या किंवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल,अशी इतर कोणतीही वस्तु बरोबर नेणे,कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे,दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्र सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे,किंवा जमा करणे किंवा तयार करणे यावर प्रतिबंध घालण्यात आले आहे.
व्यक्तिच्या किंवा प्रेताच्या किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे,जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणने,वाद्य वाजविणे,ज्यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धक्का पोहचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल,अशी आवेशपूर्ण भाषणे करणे,हावभाव करणे,अगर सोंग आणणे आणि अशी चित्रे,चिन्हे,फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे त्याचे प्रदर्शन करणे किंवा त्याचा जनतेत प्रसार करणे.उपविभागीय दंडाधिकारी,कार्यकारी दंडाधिकारी अथवा संबंधित पोलिस स्टेशन अधिकारी (जे शक्य असेल ते) यांच्या पूर्व परवानगी शिवाय कोणीही मिरवणूक काढू नये, पाच इसम किंवा त्यापेक्षा जास्त इसम सार्वजनिक जागेत सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक चावडीवर जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाही; असे आदेशित करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

गोदाम बांधकाम,तेल काढणी युनिट,कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी लाखो रुपयांपर्यंत अनुदान.. – बना स्वतःच मालक; ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील भुईमूग,करडई,तीळ यांसारख्या तेलबिया पिकांचे तसेच तूर,हरभरा व इतर कडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांचे मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी...

शाळेची पहिली घंटा वाजणार ‘या’ दिवशी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील वाढती उष्णता लक्षात घेता यंदा शाळेची पहिली घंटा उशिरा सुरू होण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून यंदा २०२६-२७ या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!