Tuesday, July 28, 2026
Homeनागपूरकाय सांगता..? घराच्या अंगणात असलेल्या विहिरीतील थंड पाणी येऊ लागले गरम..!

काय सांगता..? घराच्या अंगणात असलेल्या विहिरीतील थंड पाणी येऊ लागले गरम..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-घराच्या अंगणात असलेल्या विहिरीचे थंड पाणी अचानक गरम येऊ लागल्याने नागरिकांमध्ये कुतूहलाचा विषय ठरू लागला आहे.नागपूरच्या काटोल शहरातील नीलकंठ फुके,रा.पॉवर हाउस परिसर,काटोल यांच्या मालकीची ही विहीर असून,ती किमान ३० फूट खोल आहे.या विहिरीचे खोदकाम  फार पूर्वी करण्यात आले.विहिरीतील पाण्याचा वापर नियमित होत असल्याने पाण्याचा उपसाही होत आहे. तेव्हापासून तर दोन दिवसांपूर्वीपर्यंत या विहिरीचे पाणी थंड होते.घराच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने पाण्याचा वापर वाढला आहे.त्यातच दोन दिवसांपासून या विहिरीतून गरम पाणी येत असल्याचे पहिल्यांदा कामावरील कामगारांच्या निदर्शनास आले.शेजारच्या विहिरीतील पाण्याची तपासणी केली असता ते थंड असल्याचे नीलकंठ फुके यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी सदरची माहिती स्थानिक नगरपालिका प्रशासनाला दिली आहे.पाण्यातून वाफ निघत नसली तरी ते विहिरीतून काढून लगेच आंघोळीसाठी वापरण्याजोगे कोमट असून पाण्याला कुठलाही गंध नाही.त्यामुळे हा प्रकार नेमका कशामुळे घडत आहे,हे तपासणी अंतीच कळणार आहे.काहींच्या मते हा भूगर्भातील काही हालचालींचा परिणाम असावा,तर काहींनी गरम झरे किंवा जिओथर्मल ॲक्टिव्हिटीची शक्यता व्यक्त केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!