- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-एक दिवसापूर्वी कामासाठी घराबाहेर पडलेल्या इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना अहेरी तालुक्याच्या आलापल्ली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावरील नागमंदिराजवळील जंगल परिसरात आज,सोमवार १९ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.रवींद्र तंगडपल्लीवार वय ४५ वर्षे, रा.नागेपल्ली,ता.अहेरी,जि.गडचिरोली असे मृतकाचे नाव असून ते बँकेची आर डी गोळा करण्याचे काम करायचे.
माहितीनुसार,रवींद्र तंगडपल्लीवार हे काल रविवारी दुपारच्या सुमारास घरच्यांना सांगून काही कामानिमित्त घराबाहेर पडले होते.मात्र,सायंकाळ होऊनही ते घरी परतले नसल्याने घरच्यांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो बंद अवस्थेत होता. त्यामुळे,कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली.कुठेही थांगपत्ता लागत नसल्याने परत आज परिसरात शोध घेतला.दरम्यान,सकाळच्या सुमारास आलापल्ली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावरील नागमंदिराजवळील जंगल परिसरात रवींद्र तंगडपल्लीवार यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला.मृतदेहाची पाहणी केली असता डोक्यावर व शरीरावर गंभीर जखमा आढळून आल्या. त्यातच,एका हाताचे बोट छाटलेले दिसून आले. घटनास्थळी दोन ग्लास व एक दारुची छोटी बॉटल आढळून आल्याने हत्येचा संशय बळावला आहे.प्रकरणी घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे,ठाणेदार हर्षल एकरे पथकासह घटनास्थळी दाखल झाले.घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अहेरी येथील रुग्णालयात पाठवला.घटनेचा पुढील तपास अहेरी पोलीस प्रशासन करीत आहे.
- Advertisement -

