- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज मंगळवार २८ ऑक्टोंबरला नागपूर येथे ‘महाएल्गार’ मोर्चा काढला आहे.राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झालेली असतांनाही सरकारला शेतकऱ्यांच्या वेदना कळत नाही.शेतकरी कर्जबाजारी होत आहे; आत्महत्या करीत आहे.तरीही सरकारला जग येत नाही; त्यामुळे आता “कर्जमाफी घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही,मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांची काळजी वाटत असेल तर त्यांनी त्यांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी पाठवावे.” असे बच्चू कडू यांनी स्पष्टपणे सांगितले.अमरावती जिल्ह्यातील बेलोरा गावातून हजारो शेतकरी,शेकडो ट्रॅक्टरसह हा मोर्चा नागपूरच्या दिशेने रवाना झाला आहे.मोर्चात शेतकऱ्यांसोबत जेवण, निवास,कपडे,अन्नधान्य,भाजीपाला अशा सर्व सोयींसह मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झाले आहेत.आज होणाऱ्या महाएल्गार मोर्चात ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंधिया,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी,स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती,राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर,अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉ.अजित नवले,स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष वामनराव चटप,शेतकरी नेते प्रकाश पोहरे,क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर,शरद जोशी, विचारमंच शेतकरी संघटना महासंघाचे अध्यक्ष विठ्ठलराजे पवार आदी सहभागी होणार आहेत.विशेष म्हणजे,मुख्यमंत्री तथा राज्य गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमीतच मोठा आंदोलन उभारण्यात आला असल्याने शेतकरी कर्जमाफीच्या मागणीकडे अनेकांच्या नजरा लागलेल्या आहेत.
- Advertisement -

