- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबवण्यासाठी आणि साठेबाजी उघड करण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपन्या इंडेन, एचपी आणि भारत गॅसच्या ग्राहकांसाठी स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरसंबंधीच्या नियमांत बदल केले आहेत.त्यानुसार, चालू ऑगस्ट महिन्यापासून गॅस कनेक्शनची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणे बंधनकारक केले आहे.ज्या ग्राहकांनी आधारप्रमाणीकरण केलेले नाही,अशा सिलिंडरधारकांची जोडणी रद्द करण्यात येणार आहे. ग्राहकांना संबंधित गॅस एजन्सी किंवा कंपन्यांच्या ॲपद्वारे केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
इंडेन,एचपी आणि भारत गॅसच्या ग्राहकांनी ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल,तर त्यांना सबसिडी मिळण्यात अडथळा येईल आणि त्यांचे गॅस कनेक्शनही काही दिवसांसाठी बंद केले जाऊ शकते.अधिकृत मोबाइल ॲपच्या मदतीने फेस-ऑथेंटिकेशनद्वारे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येऊ शकेल.त्याचबरोबर,चालू ऑगस्ट महिन्यापासून पासून घरपोच गॅस सिलेंडर डिलिव्हरीचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत.आता ग्राहकांद्वारे सिलिंडर बुकिंग केल्यानंतर त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एक वन-टाइम पासवर्ड पाठवला जाईल. पासवर्डचा हा संदेश डिलिव्हरी बॉयला दाखवणे अनिवार्य आहे.गॅसचा पुरवठा कुठे-कुठे करण्यात आला,याची अपडेट एजन्सी व कंपन्यांना द्यावी लागणार आहे.ज्या गॅसधारक ग्राहकांनी अद्यापही ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही; अशांनी तात्काळ ई-केवायसी करून घ्यावी.
- Advertisement -

