- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-एकाकी जीवन जगणाऱ्या व्यक्तीने घरी छताला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना सावनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कनियाडोह येथे काल,शुक्रवारी दुपारी उघडकीस आली.राजेंद्र मारुती घोरमाडे वय ४२ वर्षे,रा.कनियाडोल,ता. कळमेश्वर असे मृताचे नाव आहे.
राजेंद्र अविवाहित असून आई व वडिलांच्या निधनानंतर तो घरी एकटाच राहायचा.त्याचा थोरला भाऊ अनिल त्याच्या कुटुंबीयांसह नागपूरला राहतो. तो शुक्रवारी रेशनचे धान्य घेण्यासाठी कनियाडोल येथे गेला होता.धान्य घेतल्यानंतर तो घरी गेला तेव्हा त्याला राजेंद्र छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने दोरीच्या मदतीने गळफास घेऊन घेत आत्महत्या केली होती.माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सावनेर शहरातील शासकीय रुग्णालयात नेला.
एकाकीपणामुळे त्याला दारूचे व्यसन जडले होते. त्यातच त्याची मनःस्थिती चांगली राहत नव्हती. त्यामुळे त्याने आत्महत्या केली असावी; असा अंदाज अनिल घोरमाडे यांनी व्यक्त केला.याप्रकरणी सावनेर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास संजय शिंदे करीत आहेत.
- Advertisement -

