Sunday, October 4, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तउन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या सुमारास रस्ते,बाजारपेठ तसेच गावखेड्यात शुकशुकाट पहावयास मिळतो आहे. अश्यातच आता हवामान खात्याने उन्हाच्या तडाख्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.उद्या,रविवार १९ एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे,सातारा,सांगली आणि सोलापूरला अवकाळी पावसाचा यलो अलर्ट, मराठवाड्यातील बीड,हिंगोली,नांदेड,लातूर, धाराशीवला अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यावेळी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. त्याचबरोबर,२० एप्रिल ते २१ एप्रिल रोजी कोकण,पश्चिम महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्र,मराठवाडा व विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडेल.या विभागातील तब्बल २२ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.यावेळी विजांचा कडकडाट होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.त्यानंतर मात्र २२ एप्रिल रोजी पावसाचे क्षेत्र कमी होणार आहे.दरम्यान, अवकाळी पावसामुळे शेत पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाला तसेच इतर पिकांचे संरक्षणासाठी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर भाजपचा सस्पेन्स संपला; विधान परिषदेच्या तीन उमेदवारांची घोषणा.. – नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी सुधाकर कोहळे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसने डॉ.अभिजीत वंजारी यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.अश्यातच आता...

हातातोंडाशी आलेले पीक जंगली हत्तींमुळे उद्ध्वस्त; शेतकरी चिंताग्रस्त..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जंगली हत्तींचा कळप ऐन निसाव्यावर आलेल्या धानपिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करीत असल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत. अश्यातच गेल्या तीन दिवसांपासून जंगली...

भरधाव ट्रेलरची दुचाकीला जोरदार धडक; पती-पत्नी व चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरहून बुटीबोरीकडे दुचाकीने निघालेल्या कुटुंबियांवर काळाने घाला घालून दुचाकीवरील पती, पत्नी व अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्याचा करून अंत झाला.तर त्यांचा ६...

धावत्या पिकअप वाहनाचा अपघात; नऊ जण गंभीर जखमी,तर आठ जण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त :-पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर जिल्ह्यात निघालेल्या मजुरांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना आज,शनिवार ३ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!