Monday, July 13, 2026
Homeगडचिरोलीउद्याला लोकशाही दिनाचे आयोजन; दुपारपर्यंत स्वीकारण्यात येणार तक्रार अर्ज..

उद्याला लोकशाही दिनाचे आयोजन; दुपारपर्यंत स्वीकारण्यात येणार तक्रार अर्ज..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-माहे नोव्हेंबर महिन्यातील लोकशाही दिनाचे आयोजन उद्या,सोमवार ३ नोव्हेंबर रोजी  जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात दुपारी ३ वाजता करण्यात आले आहे.तक्रार अर्ज स्वीकारण्याची वेळ दुपारी २ ते ३ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.तालुका पातळीवरील लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींचे समाधानकारक निराकरण न झाल्यास अशा तक्रारदारांनी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनासाठी अर्ज सादर करावेत.या अर्जात तालुका स्तरावरील अहवालाची प्रत व टोकन क्रमांक जोडणे आवश्यक आहे.तक्रार अर्ज विहित नमुन्यात (प्रपत्र १ अ ते १ ड) दोन प्रतींमध्ये सादर करावे लागतील.तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असावे.सामूहिक स्वरूपाचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत,असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा लोकशाही दिनाचे अध्यक्ष अविश्यांत पंडा यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!