Wednesday, July 15, 2026
Homeनागपूरउद्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नागपुरात..

उद्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नागपुरात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-ब्रम्हाकुमारीज नागपूरच्या वतीने ‘एकात्मता आणि विश्वासातून महाराष्ट्राचा सुवर्णकाळ’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन उद्या,बुधवार २५ फेब्रुवारी रोजी
सायंकाळी ६ वाजता जामठा येथील विश्व शांती सरोवर येथे करण्यात आला आहे.या कार्यक्रमाला देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमात एकात्मता,विश्वास,नैतिक मूल्ये आणि आध्यात्मिक विचारांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. ब्रम्हाकुमारीज संस्थेच्या वतीने विविध सामाजिक,नैतिक आणि आध्यात्मिक विषयांवर मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत.दरम्यान,राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यानिमित्त वर्धा मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.यासंदर्भात वाहतूक पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांनी अधिसूचना जारी केली आहे.या कार्यक्रमाला शहरातील अनेक व्हीआयपी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे वर्धा मार्गावर वाहतूककोंडी होण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे.वर्धा मार्गावरून बुटीबोरी मार्गे नागपूर,जबलपूर, भंडाराकडे जाणारी संपूर्ण जड वाहतूक ही बुटीबोरीकडून दाताळा मार्गे समृद्धी झीरो सर्कल येथून वळविण्यात येणार आहे.तसेच समृद्धी महामार्ग,अमरावतीकडून नागपूरकडे जाणारी वाहतूक ही समृद्धी झीरो सर्कल/वृंदावन कटिंग येथे थांबविण्यात येईल.पांजरा टोल नाक्याकडून येणारी संपूर्ण वाहतूक पांजरी टोल नाका येथे थांबेल.परंतु ज्यांना समृद्धी मार्गाकडे जायचे आहे ते तात्पुरते पांजरी टोल नाक्यावर थांबतील.पांजरा टोल नाक्याकडून वर्ध्याकडे जाणारी वाहतूक ही समृद्धी झीरो सर्कल मार्गे दाताळा गाव,बुटीबोरी अशी जाईल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!