Wednesday, September 2, 2026
Homeदेसाईगंजसमुह गित गायन स्पर्धेत देसाईगंजच्या मोहसीनभाई जव्हेरी महाविद्यालयाची उत्कृष्ट कामगिरी..

समुह गित गायन स्पर्धेत देसाईगंजच्या मोहसीनभाई जव्हेरी महाविद्यालयाची उत्कृष्ट कामगिरी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली गोंडवाना विद्यापीठ यांच्या वतीने आयोजीत अमृत,क्रिडा व कला महोत्सव-२०२६ अंर्तगत झालेल्या समुह गित गायन स्पर्धेत देसाईगंजच्या मोहसीनभाई जव्हेरी महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी वृदांनी उत्कृष्ट देशभक्तीपर ‘जिंकु किंवा मरू’ ‘समुह गित गायन’ करून द्वितीय स्थान पटकावून मानाचा तुरा रोवला.
या स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या विद्यापीठ कर्मचारी तथा गडचिरोली-चंद्रपुर जिल्ह्यातील संलग्नीत महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता.महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ.नरेंद्र आरेकर यांच्या मार्गदर्शनात व मुख्य लिपिक चंद्रकांत खोके यांच्या नेतृत्वात संजय बुराडे, नंदकिशोर अटाळकर,वैशाली ब्राम्हणे,नंदकिशोर वहांदे,कपिल ढोरे,महेश ढोरे यांनी स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करून दित्तीय स्थान पटकावले आहे. त्यांच्या या यशाबाबत महाविद्यालयांचे बल्लारपुर सेवा समिती व संस्थापक अध्यक्ष माजी आमदार जैनुद्दिन जव्हेरी,प्राचार्य डॉ.नरेंद्र आरेकर,डॉ.नाजीम शेख,डॉ. कुशल लांजेवार,प्रा.कृणल हिवसे,डॉ.सुनिल चौधरी, डॉ.सुचिता पेद्दीवार,डॉ.दिप्ती इंगोले,डॉ.आशिष सेलोकर,डॉ.रामकृष्ण येरोजवार,डॉ.गौरव निबांर्ते,प्रा. सचिन लोणारे,प्रा.प्रविण पत्रे,प्रा.सत्यनारायण पुसाला रवि जीवतोडे,नितीन पाथोडे,महेन्द घोडेस्वार,सतिश कोलावार,सतिश मेश्राम तथा सर्व प्राध्यापक वृंद तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!