Monday, July 13, 2026
Homeमुंबईउद्याला दिसणार चंद्राचे मनोहारी रूप...

उद्याला दिसणार चंद्राचे मनोहारी रूप…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-उद्या १९ ऑगस्ट रोजी संपूर्ण देशभर रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा केला जाईल. योगायोगाने याच दिवशी आकाशातील चंद्रही सर्वांत मोठा आणि अधिक तेजस्वी दिसणार आहे.यालाच ‘सुपर ब्लू मून’ असे म्हटले जाते.याला स्टर्जन मून असेही म्हटले जाते.आकाशात चंद्राचे हे मनोहारी रूप पाहणे म्हणजे सर्वांसाठी अनोखी पर्वणी ठरणार आहे.
चंद्राची पृथ्वीभोवतीची भ्रमण कक्षा लंबवर्तुळाकार असल्याने पृथ्वी व चंद्र अंतर कमी-अधिक होत असते. नेहमी हे अंतर सरासरी ३ लाख ८५ हजार किलोमीटर असते.या श्रावणी पौर्णिमेला चंद्र मकर राशीतील श्रवण या नक्षत्राजवळ रात्रभर पाहता येईल.
‘ब्लू मून’ ही एक खगोलीय घटना आहे.जेव्हा एकाच महिन्यात दोन पौर्णिमा असतात तेव्हा दुसऱ्या पौर्णिमेला किंवा एका हंगामात चार पौर्णिमा असतात तेव्हा तिसऱ्या पौर्णिमेला ‘ब्लू मून’ असे म्हणतात.जेव्हा चंद्र त्याच्या कक्षेत पृथ्वीच्या सर्वांत जवळ असतो तेव्हा त्याला ‘सुपरमून’ म्हणतात.या स्थितीत चंद्र सामान्य पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा १४ टक्के मोठा आणि ३० टक्के अधिक तेजस्वी दिसतो.तसेच दर २.५ वर्षांनी एक कॅलेंडर वर्षात १३ वी पौर्णिमा असते. या पौर्णिमेला ‘ब्ल्यू मून’ म्हटले जाते.हा दिवस उद्या १९ ऑगस्ट रोजी येत आहे.गत वर्षी ब्लू मून ३० ऑगस्ट २०२३ रोजी होता.ब्ल्यू मून दर दोन ते तीन वर्षांनी येतो.आता पुढील ब्ल्यू मून ३१ मे २०२६ रोजी होणार आहे.
१९ ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी संध्याकाळी ६:५६ वाजता चंद्रोदय होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चंद्रास्त होईल.रात्री ११:५५ वाजता चंद्र सर्वांत मोठा आणि तेजस्वी दिसणार आहे.त्या-त्या ठिकाणचे हवामान आणि दृश्यमानता यानुसार खगोलप्रेमींना चंद्राचे ‘सुपर ब्लू मून’ हे रूप पाहता येईल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!