Friday, August 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तउद्याला दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल..

उद्याला दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी-मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल नुकताच शनिवार,२ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात आला.अश्यातच दहावी बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च-२०२६ मध्ये घेतलेल्या दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल  उद्या,शुक्रवार ८ मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे.निकालापूर्वी सकाळी अकरा वाजता मंडळाकडून पत्रकार परिषद घेऊन निकालाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. त्यानंतर,विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहे.यासंदर्भातील अधिकृत घोषणा आज गुरुवारी राज्य मंडळाने केली असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे,नागपूर,छत्रपती संभाजीनगर,मुंबई, कोल्हापूर,अमरावती,नाशिक,लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी बोर्डाची परीक्षा घेण्यात आली होती.त्यानुसार,उद्या शुक्रवारी या सर्व विभागीय मंडळांच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल.
  • ‘या’ ठिकाणी पाहता येणार दहावीचा निकाल👇
https://mahahsscboard.in
https://sscresult.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या ३८ वर्षीय अंगरक्षकाने(पोलीस कर्मचारी)एका विवाहित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!