Monday, October 5, 2026
Homeगडचिरोलीउद्याला गडचिरोलीत ‘पेंशन अदालत’ व कार्यशाळा.. - निवृत्तीवेतनधारकांच्या अडचणी सुटणार जागेवर..

उद्याला गडचिरोलीत ‘पेंशन अदालत’ व कार्यशाळा.. – निवृत्तीवेतनधारकांच्या अडचणी सुटणार जागेवर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्हा कोषागार कार्यालय,गडचिरोली अंतर्गत निवृत्तीवेतन घेणाऱ्या राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक व कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांच्या अडचणींचे निरसन करण्यासाठी उद्या,मंगळवार ६ ऑक्टोंबरला ‘पेंशन अदालत’आयोजित करण्यात आली आहे.यासोबतच जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा घेण्यात येणार आहे.सदरचा कार्यक्रम सकाळी ११ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह,समाजकल्याण कॉम्प्लेक्स,गडचिरोली येथे होणार आहे.
महालेखापाल कार्यालय,नागपूर यांच्यामार्फत आयोजित या पेंशन अदालतीत निवृत्तीवेतनधारक व कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्तीवेतनविषयक प्रलंबित अडचणी,समस्या व तक्रारींवर चर्चा करून त्यांच्या निरसनासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. संबंधितांना महालेखापाल कार्यालयातील अधिकाऱ्यांसमोर आपल्या अडचणी मांडण्याची आणि शंकांचे समाधान करून घेण्याची संधी मिळणार आहे.
याच कार्यक्रमांतर्गत आयोजित कार्यशाळेत जिल्ह्यातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना ई-पीपीओ (इलेक्ट्रॉनिक निवृत्तीवेतन प्रदान आदेश) प्रणालीच्या कामकाजाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच ऑनलाइन तक्रार निवारण प्रणालीचा वापर आणि त्यासंबंधीच्या कार्यपद्धतीची माहिती महालेखापाल कार्यालयातील तज्ज्ञ अधिकारी देणार आहेत.या प्रणालींबाबत अधिकाऱ्यांच्या शंकांचेही निरसन करण्यात येणार आहे.
जिल्हा कोषागार कार्यालयांतर्गत निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक व कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या निवृत्तीवेतनविषयक अडचणी व शंका मांडाव्यात.तसेच जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी कार्यशाळेस वेळेवर उपस्थित राहावे,असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी गेडाम यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज भारतीय किसान संघातर्फे ट्रॅक्टर मोर्चा; चार जिल्ह्यातील पदाधिकारी आणि शेतकरी होणार सहभागी..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-धानाला योग्य हमीभाव,प्रलंबित बोनस तातडीने द्यावा,दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून वगळलेले भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सर्व तालुके  समाविष्ट करावेत आणि धानाचे चुकारे ४८...

“उमेद मॉल”च्या माध्यमातून महिला उद्योजकांना मिळणार मोठे व्यासपीठ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला स्वयं सहाय्यता समूहांच्या वस्तु व उत्पादन विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी राज्य...

अखेर भाजपचा सस्पेन्स संपला; विधान परिषदेच्या तीन उमेदवारांची घोषणा.. – नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी सुधाकर कोहळे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसने डॉ.अभिजीत वंजारी यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.अश्यातच आता...

हातातोंडाशी आलेले पीक जंगली हत्तींमुळे उद्ध्वस्त; शेतकरी चिंताग्रस्त..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जंगली हत्तींचा कळप ऐन निसाव्यावर आलेल्या धानपिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करीत असल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत. अश्यातच गेल्या तीन दिवसांपासून जंगली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!