Tuesday, July 14, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तउद्यापासून तापमानात बदल; वादळासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता..

उद्यापासून तापमानात बदल; वादळासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी हवामान खात्याने दिलासादायक अंदाज वर्तविला आहे.उद्या,शुक्रवार १३ मार्च ते १५ मार्चपर्यंत काही ठिकाणी ढगाळ वातावरण व वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.विदर्भातील काही जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून कमाल तापमानातील चढउतारामुळे नागरिक हैराण झाले आहेत.बहुतेक जिल्हे उन्हाच्या झळांनी त्रस्त आहेत.तीन दिवसांपूर्वी उच्चांक गाठलेले अकोल्याचे तापमान अद्यापही जास्त आहे.काल,
बुधवारी अकोल्यात ४१ अंश तापमान नोंदवण्यात आले, तर अमरावतीत ४०.४ अंश आहे.चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी शहरातही तापमान ४० अंशापर्यंत गेले आहे. नागपूरमध्ये तापमान ३८.४ अंश नोंदवण्यात आले,जे सरासरीपेक्षा ३.२ अंश अधिक आहे.त्यातच,चंद्रपूर ३८.२ अंश,तर वर्धा,वाशिम आणि बुलढाणा ३९ अंश सेल्सीअस सरासरीत आहेत.समजा,उन-पावसाचा खेळ सुरू राहिला तर जीवाची लाही-लाही झाल्याशिवाय राहणार नाही.कारण की,पुढील महिने ही तपोवनातील उष्ण तापमानाची असतात.त्यामुळे,नागरिकांनी उन्हापासून बचाव करणे गरजेचे आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!