Friday, September 11, 2026
Homeगडचिरोलीउद्यापासून गडचिरोली जिल्ह्यातील ३९ खरेदी केंद्रांवर रब्बी धानाची खरेदी सुरू..

उद्यापासून गडचिरोली जिल्ह्यातील ३९ खरेदी केंद्रांवर रब्बी धानाची खरेदी सुरू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-रब्बी हंगाम २०२४-२५ अंतर्गत शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेनुसार उद्या,शनिवार १४ जून पासून जिल्ह्यातील एकूण ३९ खरेदी केंद्रांवर रब्बी धानाची खरेदी सुरू करण्यात आली आहे.या खरेदी केंद्रांवर शासनाने निश्चित केलेल्या २ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल दराने धानाची खरेदी करण्यात येत असून त्यासाठी  कुरखेडा तालुक्यातील-१७ खरेदी केंद्र, कोरची तालुका- ४ खरेदी केंद्र,आरमोरी तालुका- ३ खरेदी केंद्र,देसाईगंज(वडसा)तालुका-१ खरेदी केंद्र, गडचिरोली तालुका-३ खरेदी केंद्र,धानोरा तालुका- २ खरेदी केंद्र तसेच सिरोंचा तालुक्यातील- ९ खरेदी केंद्रे निश्चित करण्यात आले आहेत.
सदर खरेदी केंद्रांचे संचालन आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि महामंडळाच्या माध्यमातून केले जात आहे.शासनाच्या आधारभूत किंमत योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या जवळच्या अधिकृत खरेदी केंद्रावर विहित नियम व अटींचे पालन करून धान विक्री करावी आणि अधिकृत पावती घ्यावी,असे आवाहन प्रादेशिक व्यवस्थापक,गडचिरोली यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ऐन सणाच्या दिवशीच दुर्दैवी घटना..! आयशर ट्रक आणि ट्रॅक्सचा भीषण अपघात; आठ जणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-ऐन तान्हा पोळा सणाच्या दिवशीच भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.आज,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास...

माता व नवजात बालिकेचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय पथकाला यश.. – मातामृत्यू कमी करण्यासाठी वेळेवर नोंदणी व उपचार घेण्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील कालीअम्मल हॉस्पिटल येथे अतिजोखमीच्या गर्भधारणेतील अत्यंत गंभीर व गुंतागुंतीच्या प्रकरणात वेळेवर निदान,रक्तघटकांचा पुरवठा,आवश्यक उपचार व तातडीची...

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!