Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोलीउद्यापासून गडचिरोली काँग्रेस कमिटीच्या वतीने आरमोरी विधानसभा क्षेत्रात 'जनसंवाद परिवर्तन यात्रा'...

उद्यापासून गडचिरोली काँग्रेस कमिटीच्या वतीने आरमोरी विधानसभा क्षेत्रात ‘जनसंवाद परिवर्तन यात्रा’…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या मार्गदर्शनात व आरमोरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते रामदास मसराम यांच्या संकल्पनेतून तसेच काँग्रेस कमिटी कोरची तालुकाध्यक्ष मनोज अग्रवाल,काँग्रेस कमिटी कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन पाटील नाट,काँग्रेस कमिटी आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, काँग्रेस कमिटी देसाईगंज तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, काँग्रेस कमिटी धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम यांच्या नेतृत्वात उद्या दिनांक-१९ सप्टेंबर २०२४ पासून गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी आरमोरी विधानसभा क्षेत्र यांच्या वतीने शेतकरी,कष्टकरी, शेतमजुर,बेरोजगार युवक-युवती-महिला,व्यापारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी,अशा अनेक घटकांची एकता, अखंडता आणि बंधुतेचा संदेश घेऊन जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी ‘जनसंवाद परिवर्तन यात्रा’ सुरू करण्यात येणार आहे.
काँग्रेस परिवार गेली १३८ वर्षे भारताच्या प्रगतीसाठी समर्पित आहे.आज भारत मोठ्या कठीण परिस्थितीतून सामोर जात आहे.शेती,उद्योग,वन्यप्राणी हल्ले,शिक्षणाचे बाजारीकरण,रोजगाराची कमतरता व इतर अश्या अनेक समस्यांना गोर गरीब जनता त्याचप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.भाजपा सरकारचे अपयश चव्हाट्यावर आणण्याकरिता गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी आरमोरी विधानसभा क्षेत्रातील एकता, अखंडता आणि बंधुतेचा संदेश घेऊन जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी ‘जनसंवाद परिवर्तन यात्रा’ गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यातील ढोलीगोटा येथून सकाळी १०:३० वाजेपासून सुरू करण्यात येणार असून संपूर्ण आरमोरी विधानसभा क्षेत्रामध्ये ही यात्रा निघणार आहे.सदर यात्रेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन काँग्रेसच्या हाताला हात जोडून एक सुवर्ण भारताच्या उभारणी करिता साथ द्यावी; असे आवाहन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी आरमोरी विधानसभा क्षेत्र यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष यांचा गडचिरोली दौरा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे उद्या,गुरुवार १० सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा...

कुलरमध्ये पाणी भरणे जीवावर बेतले; एकाचवेळी दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-कित्येकदा कुलर सुरू असतांना वा कुलरची बोर्डमध्ये लावलेली पिन न काढता कुलरमध्ये पाणी भरणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे.बऱ्याच नागरिकांना कुलरच्या विद्युत प्रवाहाचा...

ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारली ‘जनकल्याणम्’ अभ्यासिका.. – आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील उपक्रमाचे कौतुक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा गावातच उपलब्ध करून देण्यासाठी आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!