Tuesday, September 22, 2026
Homeगडचिरोली'ई पीक ॲप' च्या तांत्रिक अडचणींमुळे हजारो शेतकरी अडचणीत..

‘ई पीक ॲप’ च्या तांत्रिक अडचणींमुळे हजारो शेतकरी अडचणीत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-यंदा धान उत्पादक शेतकऱ्यांनी हजारो हेक्टर शेतीमध्ये खरीप धान पिकाची लागवड केली. परंतु,तांत्रिक अडचणीमुळे सातबाऱ्यावर ई पीक पाहणीची नोंद न झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.मागील काही वर्षांपासून शासनाने शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या धान पिकाची नोंदणी करण्यासाठी ‘ई पीक ॲप’ची सोय करून दिली आहे. त्यात शेतकऱ्यांनी केलेल्या धान पिकाची नोंद करण्याची सोय आहे.प्रत्यक्षात शेतावर जाऊन शेतकऱ्यांना नोंद घेऊन व फोटो घेऊन त्याची माहिती ॲपवर टाकावयाची असते.शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया केली; परंतु,तांत्रिक अडचणींमुळे काही शेतकऱ्यांची ॲपवर नोंद झाली नाही.परिणामी,हजारो शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
सध्या आधारभूत धान केंद्रावर धान पिकाची खरेदी सुरू झाली आहे.परंतु,सात-बारावर धान पीक लागवडीची नोंद काही शेतकऱ्यांची न झाल्यामुळे खरेदी केंद्रावर धान खरेदी केली जात नसल्याची ओरड आहे.सोबतच सात बारावर धान पिकाची नोंद नसल्याने भविष्यात मिळणारा बोनस व इतर सवलतींचा लाभ मिळणे कठीण होण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांना लाभ मिळावा,याकरिता जिल्हा प्रशासनाने कार्यवाही करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!