Friday, September 4, 2026
Homeगडचिरोलीआरमोरीच्या तरुणाने विष प्राशन करून केला आत्महत्येचा प्रयत्न.. - दंडाच्या रकमेतून शिक्षक...

आरमोरीच्या तरुणाने विष प्राशन करून केला आत्महत्येचा प्रयत्न.. – दंडाच्या रकमेतून शिक्षक आणि कर्मचारी पार्टी करतात; विद्यार्थ्याचा आरोप..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-आरमोरीच्या एका तरुणाने शिक्षण घेत असलेल्या कृषी महाविद्यालयाचे शिक्षक,कर्मचारी तथा महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याची चित्रफीत शनिवार ५ जुलैला समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ माजली.२२ वर्षीय अनिकेत गजेंद्र सोनटक्के आरमोरी येथील रहिवासी असून तो गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी येथील केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालयात पदवीच्या तृतीय वर्षाला शिक्षण घेत आहे.
अनिकेतच्या म्हणण्यानुसार,महाविद्यालयात गरीब आणि शेतकरी कुटुंबातील होतकरू विद्यार्थी शिक्षणासाठी प्रवेश घेतात,पण येथील शिक्षक आणि व्यवस्थापन छळ करून त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचे काम करीत असल्याचा गंभीर आरोप अनिकेत याने केला आहे. महाविद्यालयातील शिक्षक,कर्मचारी तुषार भांडारकर, पवन बुधबावरे आणि महाविद्यालय व्यवस्थापनाकडून अनेक दिवसांपासून मानसिक त्रास सुरू आहे.विरोध केल्यास अनुत्तीर्ण करण्याची धमकी देण्यात येते.दंडाच्या नावावर रक्कम वसूल करण्यात येत आहे.त्या पैशातून शिक्षक आणि कर्मचारी पार्टी करतात,असाही आरोप पीडित विद्यार्थ्याने केला आहे. त्यामुळे त्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहे,असे म्हणून विषारी द्रव्य प्राशन केले.त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने बचावला.सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असून, गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.त्याची मानसिक स्थिती बघता,डॉक्टरांनी काल,रविवार ६ जुलै रोजी पोलिसांना बयाण घेण्यास सांगितले.त्यानुसार पोलीस काय ॲक्शन घेतात,याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!