Friday, September 4, 2026
Homeदेसाईगंजआरमोरी विधानसभा मदारसंघात रामदास मसराम यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल......

आरमोरी विधानसभा मदारसंघात रामदास मसराम यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल… – पाच हजारांच्यावर कार्यकर्त्यांचा सहभाग..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रामदास मळूजी मसराम यांनी आज,मंगळवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत महारॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी ते स्वतः बैलबंडीतून आले,हे विशेष.पाच हजारांच्यावर कार्यकर्त्यांनी जुने एचपी गॅस एजन्सी कुरखेडा मार्गे,देसाईगंज या ठिकाणी एकत्र येत ‘मौसम बदलणे वाला है..मसराम आणे वाले है..!’ नारे लावीत एकत्र गोळा झाले.राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवित सभेप्रसंगी आपल्या संभाषणातून भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला.त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात,बैलबंडीवर मिरवणूक काढण्यात आली.सुरू झालेल्या महारॅलीत महाविकास आघाडीचे पदाधिकारी,नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.यात महिला-पुरुषांची संख्या लक्षणीय होती.मात्र,त्यात रोजीच्या एकाही व्यक्तीने सहभाग नोंदविला नव्हता; हेही विशेष.
जुने एचपी गॅस एजन्सी देसाईगंज ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत ही महारॅली काढून मसराम यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.’मसराम सर तुम आगे बढो,हम तुम्हारे साथ है’, ‘असा कसा येत नाही आल्याशिवाय राहत नाही’, ‘साधा माणूस,बनणार सर्वसामान्यांचा नेता’ असे नारे देत देसाईगंज परिसर दणाणून सोडले होते.महिला,ज्येष्ठ नागरिकही या महामिरवणुकीत झेंडे,टोपी,काँग्रेसचे उपरणे घालून सहभागी झाले होते.विशेष म्हणजे,आज निसर्गाने साथ देत खरोखरच मौसम म्हणजेच वातावरणातही बदल घडवून आणला होता.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!