Wednesday, September 23, 2026
Homeकोरचीआरमोरी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पक्षाच्या जनसंवाद परिवर्तन यात्रेला कोरची तालुक्यातून सुरुवात.. ...

आरमोरी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पक्षाच्या जनसंवाद परिवर्तन यात्रेला कोरची तालुक्यातून सुरुवात.. – यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोरची(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा काँग्रेस पक्षाच्या वतीनेच्या वतीने काल,गुरुवार पासून जनसंवाद परिवर्तन यात्रेची सुरुवात कोरची तालुक्यातून करण्यात आली.या यात्रेची सुरुवात तालुक्यातील श्रध्दास्थान असलेल्या ढोलीगोटा येथून विधिवत पूजा-अर्चना करून करण्यात आली.काँग्रेस पक्ष कोरचीचे तालुकाध्यक्ष मनोज अग्रवाल यांच्या नेतृत्वात ही जनसंवाद परिवर्तन यात्रा कोरची तालुक्यात आयोजित करण्यात आली असून येत्या रविवार पर्यंत ही जनसंवाद परिवर्तन यात्रा कोरची तालुक्यात सुरु राहणार आहे.
शेतकरी,कष्टकरी,शेतमजूर,बेरोजगार,युवक,महिला, व्यापारी,विद्यार्थी,विद्यार्थीनींचे व अशा अनेक घटकांच्या समस्येच्या विरोधात संपूर्ण आरमोरी विधानसभा क्षेत्रात जनसंवाद परिवर्तन यात्रा ही सुरु राहणार असून गुरुवारी कोरची येथील आठवडी बाजारात ही जनसंवाद परिवर्तन यात्रा काढून जनतेशी संवाद साधत समस्या जाणून नागरिकांशी चर्चा करण्यात आली.यावेळी शहरात छोटेखानी कॉर्नर सभा घेण्यात आली.यानंतर संध्याकाळी टेमली या गावात भेट देऊन नागरिकांशी संवाद साधण्यात आला.
यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते रामदास मसराम,महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रेमिला काटेंगे,काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सदरुद्दीन भामानी,काँग्रेस जिल्हा महासचिव हकीमुद्दीन शेख, नगरपंचायत कोरची नगराध्यक्ष हर्षलता भैसारे,माजी जिल्हा परिषद सदस्य रामसुराम काटेंगे,कुरखेडा काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष जीवन नाट,पंचायत समिती देसाईगंजचे माजी सभापती परसराम टिकले, माजी पंचायत समिती सभापती कचरीताई काटेंगे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष धनीराम हिडामी,अनुसूचित जाती सेल तालुका अध्यक्ष आनंदराव मेश्राम,रामदास साखरे,काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष जयंत हरडे, नगरसेवक दिलीप मडावी,उद्धव कोरेटी,नगरसेवक धरमसाय नैताम,नगरसेवक धनराज मडावी, नगरसेविका कौशल्या केवास,नगरसेविका निरा बघवा, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष दीपक हलामी,तुलाराम मडावी,रुख्मण घाटघुमर,आसाराम संडील,बुधराम फुलकुवर,जीवन नुरुटी,विठ्ठल शेंडे,व्यंकट वालदे,चतुर सिंद्राम,गोपाल मोहुर्ले,जावेद शेख,कमलेश बारस्कर,सागर वाढई परशुराम ठाकरे,प्रमोद पत्रे, ओमराज हार्गुळे,महेंद्र खरकाटे,कैलास वानखेडे,विजय पिल्लेवान,अमर भर्रे, जितू चौधरी,लंकेश ढोरे,रेशीम प्रधान,आकाश पेटकुले, रोशन कवासे,गोपाल दोणाडकर आदी सह बहुसंख संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.सदर जनसंवाद व परिवर्तन यात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसुन येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उच्च न्यायालयाचा दणका; अतिदुर्गम भागात दुचाकीने पोहोचले जिल्हाधिकारी व अधिकारी..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लष्कर,गोपणार,मुरडपार,हॅलोदंडी आणि धिरंगी या गावांच्या मूलभूत विकासाला प्राधान्य देऊन विविध विभागांच्या लोककल्याणकारी व विकास योजनांचा लाभ जास्तीत...

बँकेची कामे असतील तर लवकर उरकून घ्या; सलग ५ दिवस बँकिंग सेवा राहणार ठप्प..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने विविध मागण्यांसाठी शुक्रवार ११ सप्टेंबर २०२६ रोजी एक दिवसीय देशव्यापी...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेबाबत मार्गदर्शन.. -योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या गरजू व होतकरू ४० विद्यार्थ्यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत...

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!