Thursday, June 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; गडचिरोली जिल्ह्याच्या एसपींसह इतर जिल्ह्यातील एसपींच्या बदल्या..

आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; गडचिरोली जिल्ह्याच्या एसपींसह इतर जिल्ह्यातील एसपींच्या बदल्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरू असतांनाच आज,सोमवार २० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल ९ आयपीएस(भारतीय पोलीस सेवा) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यातील विशेष महत्वाची बाब म्हणजे,तब्बल साडेतीन वर्षे गडचिरोली जिल्हा पोलिस अधीक्षक पदावर कार्यरत असणारे निलोत्पल यांची गडचिरोलीवरून कोल्हापूर येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे.तर गडचिरोलीचे अप्पर पोलीस अधीक्षक एम.रमेश यांना गडचिरोली येथेच पोलीस अधीक्षक म्हणून पदोन्नतीसह नियुक्ती देण्यात आली आहे.त्याचबरोबर,योगेश गुप्ता यांना कोल्हापूरवरून गडचिरोली परिक्षेत्रात पोलीस उपमहानिरीक्षक(अतिरिक्त जबाबदारी)म्हणून नेमण्यात आले आहे.
  • आयपीएस अधिकाऱ्यांची बदली व नियुक्तीचे ठिकाण👇
१.तुषार दोशी- पोलीस अधीक्षक,सातारा यांची बदली पोलीस अधीक्षक,सांगली येथे करण्यात आली.
२.निखिल पिंगळे- पोलीस उप आयुक्त,पुणे यांची बदली पोलीस अधीक्षक,सातारा या ठिकाणी करण्यात आली.
३.संदीप घुगे- पोलीस अधीक्षक,सांगली यांची बदली
पोलीस आयुक्त,सुरक्षा,राज्य गुप्तवार्ता विभाग,पुणे येथे करण्यात आली.
४.योगेश गुप्ता- पोलीस अधीक्षक,कोल्हापूर यांची बदली पोलीस उप महानिरीक्षक,गडचिरोली परिक्षेत्र (अतिरिक्त पदभार)येथे करण्यात आली.
५.निलोत्पल- पोलीस अधीक्षक,गडचिरोली यांची बदली पोलीस अधीक्षक,कोल्हापूर या ठिकाणी करण्यात आली.
६.एम.रमेश- अप्पर पोलीस अधीक्षक,गडचिरोली यांना गडचिरोली येथेच पोलीस अधीक्षक म्हणून पदोन्नतीसह नियुक्ती.
७.महेश्वर रेड्डी- पोलीस अधीक्षक,जळगाव यांची बदली पोलीस अधीक्षक,राज्य गुन्हे अन्वेषण विभाग,पुणे या ठिकाणी नियुक्ती.
८.श्रीकांत धिवरे- पोलीस अधीक्षक,धुळे यांची बदली पोलीस अधीक्षक,जळगाव या ठिकाणी नियुक्ती.
९.राजकुमार शिंदे- पोलीस उप आयुक्त,पुणे यांची बदली पोलीस अधीक्षक,वाशीम या ठिकाणी नियुक्ती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आकांक्षित जिल्हा कामगिरीत गडचिरोली देशात ‘टॉप टेन’ मध्ये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र सरकारच्या 'आकांक्षित जिल्हा' मोहिमेतंर्गत उत्कृष्ट कामगिरी करत गडचिरोली जिल्ह्याने देशभरातील ११२ आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत पहिले १० मध्ये स्थान पटकावले आहे....

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना; कर्जमुक्ती योजनेबाबत वाचा संपूर्ण माहिती.. – कोण पात्र आणि कोण असणार अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधव राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत.अनियमित पाऊस, गारपीट,दुष्काळ,अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी...

बहिणीचा छळ असह्य; जावयाचा साळ्यानेच केला खून.. – ५० हजाराची दिली सुपारी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गेल्या सहा वर्षापासून बहिणीचा छळ करीत असल्याच्या रागातून ५० हजाराची सुपारी देत चक्क साळ्यानेच जावयाचा गेम बजावला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात...

सावधान..! जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर(Peon)पदभरतीसंदर्भात प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे खोटी,बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!