Thursday, September 10, 2026
Homeगडचिरोली‘आदि कर्मयोगी’ जिल्हास्तरीय प्रशिक्षण संपन्न.. - २ लाख ८४८ आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत शंभर...

‘आदि कर्मयोगी’ जिल्हास्तरीय प्रशिक्षण संपन्न.. – २ लाख ८४८ आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत शंभर टक्के लाभ पोहोचविण्याचे उद्दिष्ट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-केंद्र शासनाच्या धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत ‘आदि कर्मयोगी’ उत्तरदायी शासन कार्यक्रमाचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण गडचिरोली येथे संपन्न झाले.
४ ते ६ सप्टेंबर २०२५ दरम्यान शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा,गडचिरोली येथे झालेल्या तीन दिवसीय District Process Lab (DPL) प्रशिक्षणाचे मार्गदर्शन जिल्हाधिकारी अविशांत पंडा,मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे,तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी रणजीत यादव,कुशल जैन यांनी केले.
धरती आबा अभियानाची सुरुवात २ ऑक्टोंबर २०२४ रोजी हजारीबाग(झारखंड)येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते झाले.तर महाराष्ट्रात या अभियानाच्या प्रचार-प्रसार उपक्रमाचे उद्घाटन १६ जून २०२५ रोजी  मुख्यमंत्री व आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते झाले. या अभियानांतर्गत महाराष्ट्रातील ३२ जिल्हे,२१४ तालुके व ४ हजार ९७५ गावे निवडण्यात आली आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील १२ तालुके व ४११ गावे या उपक्रमात समाविष्ट असून २ लाख ८४८ आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत वैयक्तिक व सामूहिक लाभ शंभर टक्के पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.अभियानांतर्गत केंद्र शासनाने १७ विभागांच्या माध्यमातून २५ योजना राबविण्याचा आराखडा आखला असून,त्यात शिक्षण, आरोग्य,महिला व बालविकास,ग्रामीण विकास, पाणीपुरवठा,पंचायत,वन,कृषी,पशुसंवर्धन,सहकार, सार्वजनिक बांधकाम,विद्युत वितरण व आदिवासी विकास विभाग यांचा समावेश आहे.स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग यात आहे.प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा मास्टर ट्रेनर्स नितीन पाटील,योगेश वैद्य,रवी आत्राम, विक्रम सटाले,गजानन भांडेकर,प्रवीण पाटील,अखिल श्रीरामवार व माधव मडावी यांनी मोलाची भूमिका बजावली.या अभियानाच्या माध्यमातून आदिवासी भागात बहुस्तरीय क्षमता विकास घडवून आणत उत्तरदायी शासन व्यवस्था उभारण्याचा केंद्र शासनाचा उद्देश असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!