Tuesday, August 25, 2026
Homeमुंबईआता रॅगिंगच्या घटना घडल्यास कठोर कारवाई.

आता रॅगिंगच्या घटना घडल्यास कठोर कारवाई.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-मोठ-मोठी महाविद्यालये,वसतिगृहे तसेच इतर ठिकाणी रॅगिंगच्या घटना उघडकीस येऊन अनेकदा अनुचित प्रकारासह टोकाचे पाऊल उचलण्यात येत असल्याने वाढत्या रॅगिंगच्या घटनांना आळा घालण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी)कठोर पावले उचलली आहेत.येत्या शैक्षणिक वर्षांपासून एखाद्या महाविद्यालय अथवा संस्थेमध्ये रॅगिंगची घटना घडल्यास सबंधित संस्थेवर कठोर कारवाई करण्याचा इशारा यूजीसीने दिला आहे.
रॅगिंगच्या घटना रोखण्यासाठी प्रत्येक संस्थेत अँटी-रॅगिंग समितीची स्थापना होणे अनिवार्य असल्याचे यूजीसीने सर्व संस्थांना पाठवलेल्या पत्रकात म्हटले आहे.तसेच प्रत्येक संस्थेत महत्त्वाच्या ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अनिवार्य असेल.या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये सदर घटना कैद झाल्यास तातडीने त्यावर उपाययोजना होणे आवश्यक आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे अशा घटना रोखल्या जाव्यात,अशी अपेक्षाही यूजीसीने व्यक्त केली आहे.
कॅमेऱ्यांशिवाय रॅगिंगविरोधात जनजागृती करण्यासाठी अँटी रॅगिंग कार्यशाळा,परिषद आयोजित करण्यात येणार आहेत.तसेच रॅगिंग रोखण्यासाठी धोक्याच्या घंटा बसवणे,विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणे, विद्यार्थ्यांमधील रॅगिंग करू शकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याच्या परिणामांची कल्पना देणे, असे उपक्रम शैक्षणिक संस्थांनी हाती घ्यायचे आहेत. प्रत्येक शैक्षणिक संस्थेत ॲडमिशन केंद्र,फी भरणा केंद्र, वाचनालय,उपहारगृह,वसतीगृह आदी महत्त्वाच्या ठिकाणी अँटी-रॅगिंग पत्रके लावण्यात येणे अपेक्षित आहे.ही पत्रके सर्वांना व्यवस्थित वाचता येतील,अशा मापाची आणि आकाराची असावी,असेही यूजीसीने स्पष्ट केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार जमा होण्याचा मार्ग मोकळा..

उद्रेक न्युज वृत्त :-रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.महायुती सरकारने माहे-जुलै-२०२६ च्या हप्त्याच्या...

रोजगारनिर्मितीला चालना..! तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील समृद्ध वनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करणे तसेच महिलांना आधुनिक काष्ठकलेचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या शाश्वत...

तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ कासवांचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ भारतीय तारांकित (स्टार)कासवांना महाराष्ट्र वनविभाग आणि 'रेस्क्यूईक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर' अर्थात 'रॉ'...

बीअर बारचा परवाना देण्यासाठी पैश्याची लालच; अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बीअर बारचा परवाना देण्यासाठी आठ लाख रुपयांच्या लाचेच्या रकमेची मागणी करून तब्बल अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी)नागपूर पथकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!