पुणे :-आजकाल कोण कुठल्या स्तराला जाऊन पोहचेल हे सांगताच येत नाही.पूर्वी तंत्रज्ञाणाअभावी काही प्रकरणे प्रलंबित राहून फायली बंद केल्या जायच्या.मात्र,हळूहळू तंत्रज्ञानाने उंच भरारी घेत काही कालावधीतच प्रकरणांचा उलगडा केला जातो आहे.अश्यातच एका सुशिक्षित तरुणीने अशोभनीय कृत्य केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.तिला वाटले की,आपण रचलेली कथित कहाणी कुणालाही कळणार नाही,पण शेवटी भांडा फुटला आणि शरमेने मान खाली घालावी लागल्याची घटना पुण्यात उघडकीस आली.पुण्याच्या कल्याणीनगर येथील आयटी कंपनीत असलेली २५ वर्षीय तरुणी दोन वर्षापासून कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीत भावासोबत राहते.बुधवारी कुरियर डिलिव्हरी बॉय म्हणून आलेल्या तरुणाने घरात घुसून आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार तरुणीने दिली होती.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बातम्या तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याच्या पूर्वसंध्येला सदरची घटना उघड झाल्याने दबावाखाली असलेल्या पोलिसांनी पुण्यापासून दिल्लीपर्यंत तब्बल दोनशे पोलिसांचा फौजफाटा तपासकामी लावला होता.शेकडो सीसीटीव्ही फुटेज, हजारो कॉल रेकॉर्डस तपासले.सर्व कुरिअर कंपन्यांशी संपर्क करून त्यांच्याकडे कामाला असलेल्या मुलांची माहिती मिळवली.विशेष म्हणजे,सर्वत्र खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणातील आरोपी आपणच आहोत याचा तरुणीचा बॉयफ्रेण्ड असलेल्या तरुणाला पत्ताच नव्हता.गुरुवारी नेहमीप्रमाणे त्याने बाणेरमधील आपल्या ऑफीसमध्ये काम केले.नात्यातील एक लग्न असल्याने शुक्रवारी तो तिकडे गेला होता.पोलिसांनी या लग्नसोहळ्यातून त्याला ताब्यात घेतले आणि घडलेल्या प्रकाराचा उलगडा झाला.घटनेच्या दिवशी बुधवारी तिचा भाऊ परगावी गेला होता.सायंकाळी साडेसातच्या सुमारास तरुणी एकटीच फ्लॅटवर होती. त्यामुळे तिला भेटण्यासाठी तरुण आला होता. त्यावेळी शारिरीक संबंध ठेवण्यावरुन दोघांमध्ये वाद झाला.मुलाने संबंधाची इच्छा व्यक्त केली.मासिक पाळीचे कारण देत तरुणीने नकार दिला.मात्र,तरुणाने तिच्यावर बळजबरी केली.त्यातून दोघांमध्ये वाद झाला आणि तरुणीने पोलीस ठाणे गाठत डिलिव्हरी बॉयकडून अतिप्रसंग झाल्याची स्टोरी रंगवली.मात्र, पोलिसांनी तरुणाला अटक केल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला.महत्वाचे म्हणजे, दोघांच्याही कुटुंबीयांचा परस्परांशी परिचय आहे.या दोघांत एक-दीड वर्षापासून गेटवर सिक्यूरिटी गार्डकडे कुरियर बॉय म्हणून तो नोंदणी करायचा.गार्डने खातरजमा करण्यासाठी फोन केल्यावर तरुणीही दुजोरा द्यायची. घरच्यांना कळू नये म्हणून दोघांनी लढवलेली ही शक्कल होती.तरुणीने पोलिसांत तक्रार देण्याआधी मोबाईल,लॅपटॉपमधील तरुणाशी संबंधित डेटाही डिलीट केला होता.मासिक पाळीचे कारण देत तरुणीने शरीरसंबंधास नकार दिल्यानंतरही तरुणाने बळजबरी केल्यामुळे तिने हे सगळे नाट्य रचल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
आता ‘या’ तरुणीला म्हणावे तरी काय? चक्क बॉयफ्रेण्डलाच बनवले कुरियर डिलिव्हरी बॉय अन् बलात्काराचा केला बनाव.. -कल्पना नसलेल्या तरुणाला पोलिसांनी उचलले लग्नसोहळ्यातून..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

