Sunday, August 9, 2026
Homeगडचिरोलीआता बचत गटांना मिनी ट्रॅक्टरसाठी ३.१५ लाखांचे अर्थसाहाय्य वस्तू स्वरूपात न देता...

आता बचत गटांना मिनी ट्रॅक्टरसाठी ३.१५ लाखांचे अर्थसाहाय्य वस्तू स्वरूपात न देता थेट बचत गटांच्या बँक खात्यात होणार जमा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने पुरवण्याच्या योजनेत शासनाने महत्त्वाचा बदल केला आहे.आता हे अर्थसाहाय्य वस्तू स्वरूपात न देता थेट बचत गटांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे.सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,गडचिरोली यांच्या कार्यालयामार्फत या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधने खरेदी करण्यासाठी जास्तीत जास्त ३.१५ लाख रुपये अर्थसाहाय्य मंजूर केले जाईल.ही रक्कम बचत गटाच्या आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँक खात्यात थेट जमा करण्यात येईल.
बचत गटातील सर्व सदस्य महाराष्ट्राचे रहिवासी असावेत.बचत गटात किमान ८० टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत. बचत गटाचे अध्यक्ष व सचिव हे अनिवार्यपणे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असणे आवश्यक आहे.बचत गटाचे स्वतःचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असावे आणि ते अध्यक्ष व सचिवांच्या आधार क्रमांकाशी जोडलेले असावे.खरेदी केलेला मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने भारत सरकारच्या कृषी विभागाने निर्धारित केलेल्या मानकानुसार (Specification)असावीत.बचत गटातील सदस्याने मिनी ट्रॅक्टर चालवण्याचे अधिकृत प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.हे साहित्य खरेदी केल्यानंतर पुढील १० वर्षे ते विकता किंवा गहाण ठेवता येणार नाही,असे हमीपत्र देणे बंधनकारक आहे.ज्या स्वयंसहाय्यता बचत गटांनी यापूर्वी ‘पावर टिलर’ किंवा ‘मिनी ट्रॅक्टर’ योजनेचा लाभ घेतला आहे,त्यांना या नवीन योजनेचा लाभ घेता येणार नाही. पात्र बचत गटांनी अधिक माहितीसाठी आणि अर्जासाठी सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,गडचिरोली यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.अधिक माहितीसाठी कार्यालयीन संपर्क क्रमांक ९४२३११६१६८ यावर संपर्क करावा,असे आवाहन केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेल्वेची जोरदार धडक; बिबट्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा वनपरिक्षेत्राच्या मूर्ती वनक्षेत्रातून गेलेल्या दक्षिण मध्य रेल्वेच्या बल्लारशाह-काजीपेठ रेल्वे मार्गावरील कक्ष क्रमांक-५९० मधील पोल क्रमांक १५२/२६ नजिक एका नर बिबट्याचा रेल्वेच्या...

ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची साडेसात लाखांची फसवणूक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका अज्ञात सायबर चोरट्याने ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची तब्बल साडेसात लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. डॉ.राघवेंद्र...

एकेकाळी ज्या भागात फडकायचे लाल,काळे झेंडे; आता पहिल्यांदाच फडकणार तिरंगा..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील नक्षलवादाची संपूर्ण मुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत उपटून फेकण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर करताच राज्याच्या विविध जिल्ह्यातील...

महागाईची झळ; दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीसह दूध विक्रीत होणार वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-अगोदरच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असतांनाच आता त्यात आणखी भर पडून दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांनी दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!