Tuesday, July 14, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता नंबर पाहून व्हॉट्सॲपवर त्रास देणाऱ्यांची बोलती होणार बंद..!

आता नंबर पाहून व्हॉट्सॲपवर त्रास देणाऱ्यांची बोलती होणार बंद..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-देशातच नव्हे तर जगभरात व्हॉट्सॲपची क्रेझ वाढलेली आहे.व्हॉट्सॲपमुळे अनेक कामे एका झटक्यात होऊ लागली आहेत.अनेकांनी व्यवसायिक,शासकीय,राजकीय,शैक्षणिक,मैत्रीचे, बातम्यांचे,रोजगाराचे व इतर विविध प्रकारचे ग्रुप तयार करून आदानप्रदान सुरू केली आहे.अश्यातच काहीजण ग्रुपमधील तरुणी,महिला वा इतरांचे मोबाईल नंबर काढून नाहक त्रास देण्याचे काम करतांना दिसून येतात.यासाठी यावर रामबाण उपाय म्हणून व्हॉट्सॲप नवे फीचर आणत आहे.सध्या स्थितीत एखाद्याला व्हॉट्सॲप मॅसेज केल्यास,तुमचा मोबाईल नंबर त्या व्यक्तीला दिसत असतो.मात्र,आता येणाऱ्या नव्या फीचरमुळे,तुमच्या मोबाईल नंबरऐवजी तुमचा फक्त युनिक यूजरनेम दिसेल. येणाऱ्या नव्या फीचरला ‘यूजरनेम’ असे नाव देण्यात आले आहे.जे वापरकर्ते मॅसेज पाठवतांना आपला नंबर शेअर करू इच्छित नाहीत,त्यांच्यासाठी हे फीचर खूप फायदेशीर ठरणार आहे.या फीचरमुळे तुम्ही तुमचा आवडता यूजरनेम तयार करू शकाल.हा यूजरनेम तुमच्या प्रोफाइलवर दिसू शकेल आणि लोक तुमच्याशी तुमच्या नंबरऐवजी या यूजरनेमद्वारेच जोडले जातील. गोपनीयता वाढवण्यासाठी हे फीचर खूप महत्त्वाचे ठरणार आहे.सध्या ‘यूजरनेम’ फीचरची चाचणी सुरू असून ते लवकरच सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!