Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोलीआता पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठी आरक्षण सोडत..!

आता पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठी आरक्षण सोडत..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-ग्रामविकास विभाग,मंत्रालय मुंबई यांच्या १७ सप्टेंबर २०२५ च्या पत्रान्वये गडचिरोली जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले असून,त्यानुसार आरक्षण सोडत येत्या,शुक्रवार १० ऑक्टोंबर २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात काढण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील एकूण १२ पंचायत समित्यांपैकी देसाईगंज,आरमोरी,गडचिरोली,चामोर्शी आणि मुलचेरा या पाच पंचायत समित्या संपूर्णतः अनुसूचित क्षेत्रात न मोडणाऱ्या आहेत.त्यामुळे या पंचायत समित्यांतील सभापती पदांसाठी एक पद अनुसूचित जाती (महिला), एक पद अनुसूचित जमाती(महिला),दोन पदे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग,आणि एक पद नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)या वर्गांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.
दरम्यान,कोरची,कुरखेडा,धानोरा,एटापल्ली,भामरागड, अहेरी आणि सिरोंचा या सात पंचायत समित्या संपूर्णतः अनुसूचित क्षेत्रात येतात.त्यामुळे या समित्यांतील सभापती पदांसाठी तीन पदे अनुसूचित जमाती आणि चार पदे अनुसूचित जमाती(महिला) वर्गासाठी राखीव करण्यात आली आहेत.
गडचिरोली जिल्ह्याच्या सर्व १२ पंचायत समित्यांच्या सभापती पदांसाठी अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,नागरिकांचा मागासवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्ग तसेच महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याची सोडत पारदर्शक पद्धतीने घेण्यात येणार आहे.
या सोडतीस उपस्थित राहण्याची इच्छा असणाऱ्या नागरिकांनी वरील ठिकाणी व वेळेस उपस्थित राहावे, असे प्राधिकृत अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (सामान्य)स्मिता बेलपत्रे यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!