Friday, September 11, 2026
Homeनागपूरआता आरोपींची संख्या झाली सहा; अर्जुनी-मोरगाव येथील शिक्षकास अटक... - नकली मुख्याध्यापक...

आता आरोपींची संख्या झाली सहा; अर्जुनी-मोरगाव येथील शिक्षकास अटक… – नकली मुख्याध्यापक घोटाळा प्रकरण…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-बनावट कागदपत्रांच्या आधारावर मुख्याध्यापक पदास मंजुरी दिल्याच्या प्रकरणात पोलिसांनी आणखी एकास अटक केली आहे.गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव येथील न्यू मॉडेल स्कूलचा शिक्षक महेंद्र भाऊराव म्हैसकर वय ४४ वर्षे आवळेनगर,टेकानाका असे अटक केलेल्या सहाव्या आरोपीचे नाव आहे.सदर आरोपीने बोगस कागदपत्रे बनवून दिल्याचे उघड झाले आहे.मात्र,त्याच्या अर्धवट ज्ञानामुळे त्याने बनावट कागदपत्रे बनवितांना क्षुल्लक चुका केल्या व तो पोलिसांच्या रडारवर आला.त्याला काल,गुरुवारी१७ एप्रिलला सायंकाळी अटक करण्यात आली.त्यानुसार आता पर्यंत नागपूर शिक्षण विभागाचे उपसंचालक उल्हास नरड,नकली मुख्याध्यापक पराग नानाजी पुडके,माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधीक्षक नीलेश शंकरराव मेश्राम,विभागीय उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक संजय शंकरराव दुधाळकर,लिपीक सुरज पुंजाराम नाईक व आता शिक्षक महेंद्र भाऊराव म्हैसकर अशी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींची नावे आहेत.
आरोपी मुख्याध्यापक पराग नानाजी पुडके याला शिक्षक पदाचा अनुभव नसतांना तसेच शिक्षक म्हणून कोठेही काम केले नसतांना सरळ मुख्याध्यापक बनविण्यात आले.आरोपी मुख्याध्यापक पराग पुडके याने नागपूर येथील एस.के.बी.उच्च प्राथमिक, माध्यमिक विद्यामंदिर,यादवनगर या शाळेची बोगस व बनावट कागदपत्रे तयार करून त्या आधारावर उपसंचालक उल्हास नरड यांनी आर्थिक व्यवहार करून चुकीच्या पद्धतीने नानाजी पुडके विद्यालय जेवताळा,ता.लाखनी, जि.भंडारा येथे मुख्याध्यापक पदासाठी मंजुरी दिली.या प्रकरणांमध्ये सदर पोलिसांनी उपसंचालक उल्हास नरड यांच्यासह पाच जणांना ताब्यात घेतले होते.या प्रकरणात पोलिसांनी पुडके व नरडची चौकशी केली व त्यात गोंदियातील अर्जुनी मोरगाव येथील न्यू मॉडेल स्कूलचा शिक्षक महेंद्र भाऊराव म्हैसकर वय ४४ वर्षे आवळेनगर,टेकानाका याचे नाव समोर आले. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता म्हैसकर यानेच या प्रकरणात बोगस कागदपत्रे तयार करून दिल्याची बाब समोर आली.पोलिसांनी म्हैसकरला काल गुरुवारी अटक केली.या प्रकरणातील अटक झालेल्या आरोपींची संख्या आता सहा झाली आहे.
पुडकेला मुख्याध्यापक पदाच्या मान्यतेसाठी शिक्षक म्हणून काम केल्याचे अनुभव प्रमाणपत्र हवे होते. त्यासाठी म्हैसकरने पुडकेची मदत केली.२०२२ मध्ये त्याने ओंकार मल्टिपरपज शिक्षण संस्थेतर्फे चालविण्यात येणाऱ्या एस.के.बी.हायस्कूल, यादवनगर येथे पुडके १ ऑगस्ट २०१७ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत कार्यरत असल्याचे अनुभव प्रमाणपत्रदेखील तयार करून दिले.त्यावर मुख्याध्यापिकेची बोगस स्वाक्षरीदेखील होती. त्याआधारे पुडकेला मुख्याध्यापकपदाची मान्यतादेखील मिळवून देण्यात आली.मात्र संस्थेचे अध्यक्ष ओंकार अंजीकर यांच्या लक्षात हा गैरप्रकार आला.त्यांनी ऑगस्ट २०२३ मध्येच उपसंचालक कार्यालयाकडे तक्रार केली होती.मात्र,त्याची गंभीरतेने दखल न घेण्यात आल्याने २०२४ मध्ये त्यांनी परत तक्रार केली.मुख्याध्यापक नियुक्ती प्रकरणात आवश्यक असलेली कागदपत्रे बनावट पद्धतीने म्हैसकरने तयार करून दिली होती.मात्र,शिक्षक असूनदेखील लेटरपॅड तयार करतांना तसेच इतर दस्तावेजांवर वेलांटी,मात्रा अशा शुल्लक व्याकरणाच्या चुका त्याने केल्या होत्या.त्यामुळे तो सहजपणे अनेकांच्या नजरेत आला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!