Saturday, May 2, 2026
Homeगडचिरोलीआजपासून "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरास" सुरुवात.. - महसूल विषयक समस्या...

आजपासून “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरास” सुरुवात.. – महसूल विषयक समस्या थेट प्रशासनासमोर मांडण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील महसूल मंडळ स्तरावर ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानास आज, शनिवार ७ मार्च पासून सुरुवात करण्यात आली असून या शिबिरांमधून नागरिकांना महसूल विषयक विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या.सदर शिबिरांमध्ये प्रामुख्याने प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निपटारा,महसूल अभिलेख दुरुस्ती,लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत सेवा,अकृषक (NA) परवानगीबाबत मार्गदर्शन,भूसंपादन प्रकरणातील कागदपत्रांची पूर्तता,ई-मोजणी,ॲग्रीस्टॅक नोंदणी, पीएम किसान योजनेबाबत मार्गदर्शन तसेच नागरिकांच्या तक्रारींचे निवारण अशा विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.
पोर्ला येथे आयोजित शिबिरास जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला.प्रशासन थेट नागरिकांच्या दारापर्यंत सेवा पोहोचवत असून महसूल विषयक प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी तसेच डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी या शिबिरांचा अधिकाधिक लाभ घ्यावा,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा रै.येथील शिबिरात बोलतांना आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांनी सांगितले की,छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या आदर्शावर आधारित शासन व्यवस्था सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे.या शिबिरांमुळे सातबारा फेरफारसारख्या महसूल सेवा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचत असून पात्र लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वितरणही करण्यात येत आहे.डिजिटल प्रणालीमुळे प्रशासनात पारदर्शकता वाढत असून तांत्रिक अडचणींमुळे कोणाचेही काम प्रलंबित राहू नये,यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.
आज शनिवारी पार पडलेल्या शिबिरांमध्ये पोर्ला(ता. गडचिरोली),खमनचेरू(ता.अहेरी),कुनघाडा रै.(ता. चामोर्शी),लगाममाल(ता.मुलचेरा),शंकरपूर (ता. देसाईगंज),वैरागड (ता.आरमोरी)तसेच कढोली(ता. कुरखेडा) या महसूल मंडळांचा समावेश होता. याशिवाय मसेली (ता.कोरची),बामणी(ता.सिरोंचा), मन्नेराजाराम (ता.भामरागड),मुरुमगाव (ता.धानोरा) व जारावंडी(ता.एटापल्ली)येथेही शिबिरांचे आयोजन करण्यात आले.या सर्व ठिकाणी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध शासकीय सेवांचा लाभ घेतला.दरम्यान,अभियानाच्या पुढील टप्प्यात १४ मार्च २०२६ रोजी जिल्ह्यातील विविध महसूल मंडळांमध्ये पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.त्यामध्ये बाम्हणी(ता.गडचिरोली),पेरमिली(ता.अहेरी),येणापूर (ता.चामोर्शी),देऊळगाव (ता.आरमोरी),मालेवाडा(ता. कुरखेडा),बेळगाव(ता.कोरची),पेंटीपाका(ता. सिरोंचा),ताडगाव(ता.भामरागड),सुरसुंडी(ता. धानोरा)व कोटमी(ता.एटापल्ली)या महसूल मंडळांचा समावेश आहे.त्यानंतरही १० एप्रिल,१७ एप्रिल, २४ एप्रिल,८ मे, १५ मे या नियोजित तारखांना महसूल मंडळनिहाय ठिकठिकाणी या शिबिराचे आयोजन केले जाणार आहे.नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घेऊन आपल्या महसूल विषयक समस्या थेट प्रशासनासमोर मांडाव्यात,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!