- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-पुढील दोन दिवस विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेत मोठी वाढ होण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविली आहे. यात वर्धा,अकोला आणि अमरावती या तीन जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेबाबत हवामान खात्याकडून चेतावणी जारी करण्यात आली असून इतर भागांमध्येही कमाल तापमान सामान्यापेक्षा सुमारे ३ ते ४ अंश सेल्सिअसने अधिक राहण्याची शक्यता आहे.यामुळे, उष्णतेचा त्रास जाणवू शकतो.उन्हाच्या तीव्रतेपासून बचावासाठी नागरिकांनी स्वतःची आणि कुटुंबीयांची काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे,थकवा येणे किंवा उष्माघाताचा धोका वाढणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.त्यामुळे नागरिकांनी दैनंदिन कामकाज करतांना विशेष खबरदारी घेणे आवश्यक असल्याचेही विभागाने स्पष्ट केले आहे.शक्य असल्यास दुपारी १२ ते ३ या वेळेत बाहेर जाणे टाळावे,नियमितपणे पाणी आणि इतर द्रवपदार्थ घ्यावेत.तसेच हलके,सैल आणि फिकट रंगाचे सूती कपडे वापरावेत.बाहेर जातांना टोपी,छत्री किंवा ओले कापड वापरून डोके झाकल्यास उष्णतेपासून संरक्षण मिळू शकते.मद्यपान तसेच चहा, कॉफी आणि गॅसयुक्त पेयांचे सेवन कमी करावे.याशिवाय लहान मुले,वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी व उन्हापासून स्वतःचा बचाव करावा.
- Advertisement -

