उद्रेक न्युज वृत्त :-शेतकऱ्यांकडून मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंळाद्वारे हमीभावाने धान खरेदी केली जाते.मात्र,खरिपातील धान खरेदीला सुरुवात होऊन दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही चुकाऱ्यांसाठी शासनाकडून एक रुपयांचाही निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही.भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी भरघोस पीक घेऊन शासकीय धान खरेदी केंद्रांवर धानाची विक्री केली.परंतु, धानाचे चुकारे अद्याप थकीत असल्याने याची दखल घेत आमदार परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चुकाऱ्यांसाठी त्वरित निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती.त्यानुसार,फडणवीस यांनी आज, मंगळवार ३ फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांचे थकीत धानाचे चुकारे जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.यामुळे आज शेतकऱ्यांच्या खात्यात धानाच्या चुकाऱ्यांची रक्कम जमा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आज शेतकऱ्यांच्या धानाच्या चुकाऱ्यांची रक्कम जमा होण्याची शक्यता..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

