- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित ‘मंथन फॉर युवा’ (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा वादनाचा एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित करण्यात आला.तब्बल ४ हजार १०० तरुण-तरुणींनी एकत्र येऊन ढोल आणि ताशाचे वादन केले.विशेष म्हणजे,विदर्भातील विविध शहरांमधून दोनशेहून अधिक ढोल-ताशा पथकांना एकाच मंचावर आमंत्रित करण्यात आले होते.या ऐतिहासिक कार्यक्रमात तब्बल ५८५ ध्वजधारकांनी आपापल्या पथकाचे नेतृत्व केले.या ऐतिहासिक कामगिरीची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स,इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियामध्ये नोंद करण्यात आली.नागपूरच्या भूमीतून युवा ऊर्जा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा अनोखा विश्वविक्रम साकारण्यात आला.या विक्रमी आयोजनाची दखल घेण्यासाठी ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’चे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते.त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाची पाहणी करून विक्रम यशस्वी झाल्यानंतर आयोजकांना अधिकृत प्रमाणपत्र प्रदान केले.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील तरुण पिढीसोबत संवाद साधत त्यांच्या सांस्कृतिक उत्साहाचे कौतुक केले.
- Advertisement -

