Wednesday, April 15, 2026
Homeगडचिरोलीआज देसाईगंज तालुक्यातील विकासकामांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून ऑनफिल्ड आढावा.. - देसाईगंज नगर परिषदेच्या पाणीपुरवठा...

आज देसाईगंज तालुक्यातील विकासकामांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून ऑनफिल्ड आढावा.. – देसाईगंज नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेच्या संथगतीवर नाराजी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज,बुधवार ८ एप्रिल रोजी देसाईगंज तालुक्याचा दौरा करून विविध विकासकामे,सुरक्षा व्यवस्था आणि स्थानिक उपजीविका उपक्रमांचा सखोल ऑनफिल्ड आढावा घेतला.या दौऱ्यात पाणीपुरवठा,कृषी,सूक्ष्म अन्नप्रक्रिया तसेच पायाभूत सुविधा यासंबंधित महत्त्वाच्या प्रकल्पांची पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
जिल्हाधिकारी यांच्यासोबतच अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे,निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे,जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार तसेच उपजिल्हाधिकारी(रोहयो)स्मिता बेलपत्रे यांनीही आपल्या कार्यक्षेत्राशी संबंधित ठिकाणी भेटी देऊन विविध बाबींची पाहणी करत सर्वंकष आढावा घेतला.
  • पाणीपुरवठा योजनेवर नाराजी👇
देसाईगंज नगरपरिषद अंतर्गत सुरू असलेल्या सुमारे ६० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेची पाहणी करतांना कामाच्या संथ गतीवर जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.ही योजना निर्धारित वेळेत पूर्ण होणे अत्यावश्यक असल्याचे नमूद करत कामाला गती देऊन ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.नागरिकांना नियमित,सुरक्षित व स्वच्छ पाणीपुरवठा उपलब्ध करण्यासाठी नियोजन अधिक प्रभावी करण्यावरही त्यांनी भर दिला.
  • कृषी प्रकल्पांना प्रोत्साहन👇
कृषी क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेत जिल्हाधिकाऱ्यांनी शेडनेट व पॉलीहाऊस प्रकल्पांना भेट दिली.विविध कृषी योजनांच्या एकत्रित अंमलबजावणीद्वारे तसेच शेतकऱ्यांनी स्वखर्चातून उभारलेल्या रोपवाटिका पॉलीहाऊसची त्यांनी पाहणी केली.आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून उत्पादन व उत्पन्न वाढविण्यासाठी अशा उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
  • सूक्ष्म अन्नप्रक्रिया व स्थानिक उपक्रमांची पाहणी👇
सावंगी येथील डाळ मिलला भेट देत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत सुरू असलेल्या सूक्ष्म अन्नप्रक्रिया उपक्रमाची पाहणी केली.ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती वाढविण्यासाठी अशा उपक्रमांना चालना देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. स्थानिक उत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल,असेही त्यांनी सांगितले.
त्यानंतर विसोरा येथील एसआरपीएफ कॅम्पला भेट देऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सुरक्षा यंत्रणांमधील समन्वय अधिक बळकट करण्याबाबत चर्चा केली व जवानांच्या सुविधा व कार्यपद्धतीची सविस्तर माहिती घेतली.
दौऱ्यात त्यांनी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत सुरू असलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पर्यटन पार्कच्या कामाची पाहणी केली.तसेच तलाठी दफ्तार, शाळा व इतर विकासकामांचीही पाहणी करण्यात आली.स्थानिक प्रशासन अधिक कार्यक्षम व लोकाभिमुख राहण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे,असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
या दौऱ्यात देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी प्रसेनजित प्रधान,तहसीलदार प्रिती डुडुलकर व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!