Sunday, May 31, 2026
Homeनागपूरदोन हजारासाठी अकाउंटंट सीबीआयच्या जाळ्यात..

दोन हजारासाठी अकाउंटंट सीबीआयच्या जाळ्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-सीबीआय नागपूरच्या पथकाने मध्य रेल्वेच्या भुसावळ येथील विभागीय वित्त व्यवस्थापक कार्यालयात कार्यरत असणाऱ्या एका अकाउंटंटला दोन हजाराची लाच घेतांना रंगेहाथ अटक करून गुन्हा दाखल केला आहे.संजीतकुमार असे आरोपी अकाउंटंटचे नाव असून त्याने रेल्वेत कार्यरत ट्रॅकमॅनकला पैश्याची मागणी केली होती.
प्रकरणातील तक्रारदार ट्रॅकमॅन अकोला जिल्ह्यात कार्यरत असून ‘एमएससीपी’ अंतर्गत त्यांचा ५८ हजार ७०० रुपयांचा एरिअर्स थकीत होता.त्याबाबतचा प्रस्ताव मूर्तिजापूर कार्यालयातून भुसावळला पाठविण्यात आला होता.तक्रारदाराने १३ मार्च रोजी संबंधित कामासाठी संजीतकुमारची भेट घेतली; परंतु संजीतने त्यांना फाईलवर प्रक्रिया करण्यासाठी पाच हजारांची मागणी केली.जर पैसे दिले नाही तर प्रस्ताव तेथेच धूळखात पडला राहील,अशी धमकीदेखील दिली.आपल्याच हक्काच्या पैशांसाठी लाच देण्याची इच्छा नसल्याने ट्रॅकमॅनने दोन दिवसांपूर्वी थेट सीबीआय कार्यालयाला पत्र लिहून तक्रार केली. त्यानंतर,सीबीआयच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली.संजीतकुमारने तक्रारदाराला दोन हजारांत काम करून देईन,असे सांगितले. सीबीआयच्या पथकाने संजीतकुमारविरोधात गुन्हा दाखल केल्याने रेल्वे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.विशेष म्हणजे,संजीतकुमारने आणखी किती जणांकडून अश्या प्रकारची वसुली केलीय,याचा तपास सुरू करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तरुणाने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका ३६ वर्षीय विवाहित तरुणाने राहत्या घरीच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना आज,रविवार ३१ मे रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा शहरातील...

विवाहित महिलेचा गळा चिरून हत्या करणारा आरोपी अटकेत.. – क्षुल्लकशा कारणावरून हत्या; बालपणापासून होते प्रेमप्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या धोपटाळा कामगार वसाहतीत एका विवाहित महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण हत्या करण्यात आल्याची थरारक घटना शुक्रवार...

धानोरा व एटापल्ली तालुक्यात २० हजार धुररहित चुलींचे वितरण.. -दरवर्षी ४१ हजार टनांहून अधिक जळाऊ लाकडाची होणार बचत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शन व पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा व एटापल्ली या दुर्गम,आदिवासी तालुक्यांमध्ये राबविण्यात आलेल्या धुररहित चुल उपक्रमाला उल्लेखनीय...

चार दिवसांत उष्माघाताचे तब्बल १८ जण बळी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या नवतपाचे दिवस सुरू आहेत.२५ मे २०२६ पासून सुरू झालेली सूर्याची दाहकता २ जून २०२६ पर्यंत राहणार आहे.अश्यातच भयंकर तापणाऱ्या नवतप्याने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!