Tuesday, September 1, 2026
Homeनागपूरआगीचे रौद्ररूप; लोकवस्तीपर्यंत पोहचणार तोच मदतीसाठी धावा..!

आगीचे रौद्ररूप; लोकवस्तीपर्यंत पोहचणार तोच मदतीसाठी धावा..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-सिंथेटिक पाईप जवळच असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागून आगीने रौद्ररूप धारण केल्याची घटना आज,सोमवार २ मार्च रोजी सकाळच्या सुमारास नागपूर शहरातील नरसाळा परिसरातील चाणक्यपूरम परिसरात घडली.सदरची आग लोकवस्तीपर्यंत पोहचणार तोच मदतीसाठी वेळीच धावा केल्याने मोठा अनर्थ टळला.यात जीवितहानी टळली असली तरीही तब्बल ७०० सिंथेटिक पाईप जळून खाक झाल्याने कंत्राटदाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
नरसाळा परिसरातील एका पाण्याच्या टाकीखाली मोठ्या प्रमाणात सिंथेटिक पाईप साठवून ठेवण्यात आले होते.आज सोमवारी सकाळी या पाईप जवळ असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला अचानक आग लागली.सदरची आग वेगाने पसरत पाईप ठेवलेल्या ठिकाणापर्यंत पोहचली आणि पाईपवरील रबराच्या आवरणामुळे आगीने भीषण रूप धारण केले आणि अवघ्या काही मिनिटांतच परिसरात काळेकुट्ट धुराचे लोट पसरले.तब्बल अर्धा तास परिसरात धुराचे साम्राज्य असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. लागलीच स्थानिक नागरिकांनी अग्निशमन विभागाला पाचारण केले.घटनेची माहिती मिळताच काही मिनिटांत अग्निशमन दलाचे तीन वाहन पथकासह घटनास्थळी दाखल झाले.युद्धपातळीवर प्रयत्न करत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवल्याने अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली.सदरची आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसून सर्वप्रथम कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागून ती हळूहळू पसरत जाऊन आगीने रौद्ररूप धारण केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे वा कुणीतरी जाणून बुजून आग लावली असावी,अशी शक्यता नाकारता येणार नाही,अशी शंका परिसरातील नागरिकांनी उपस्थित केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!