Saturday, April 18, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तउर्वरित जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी जुलै महिन्यापर्यंत पहावी लागणार वाट..

उर्वरित जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी जुलै महिन्यापर्यंत पहावी लागणार वाट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच वर्षांपासून स्थगित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका,नगर परिषद तसेच १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका पूर्ण केल्या असून त्या ठिकाणी विविध पदाधिकारी वेगवेगळ्या पदांवर विराजमान झाले आहेत.अशातच विदर्भ आणि मराठवाड्यातील तब्बल २० जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याचा प्रयत्न सुरू असतांनाच सर्वोच्च न्यायालयाने ५० टक्के ओबीसी आरक्षणाचे उल्लंघन करणाऱ्या जिल्हा परिषदेतील जोपर्यंत निकाल लागत नाही,तोपर्यंत तेथील निवडणुका घेऊ नयेत,असा आदेश दिला.प्रकरणी निवडणुका लांबणीवर गेल्याने सर्वोच्च न्यायालयाने सरन्यायाधीश सुर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली तीन न्यायाधिशांचे खंडपीठ गठीत करण्यात आले आहे.या खंडपीठासमोर येत्या,२१ आणि २२ जुलै २०२६ रोजी सुनावणी होणार आहे.सुनावणीत उर्वरित जिल्हा परिषदेतील निवडणुकांसंदर्भात पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याने तोपर्यंत जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होऊ शकणार नसल्याने आता निवडणुकांसाठी जुलै महिन्यापर्यंत  वाट पहावी लागणार असल्याचे चित्र आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

देसाईगंज-आरमोरी काँग्रेस कमिटीची “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या सिंधू भवन येथे आज,शुक्रवार १७ एप्रिल रोजी तालुका काँग्रेस कमिटी देसाईगंज-आरमोरी यांच्या वतीने आयोजित “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” उत्साहात पार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!