Wednesday, August 26, 2026
Homeनागपूरअवैध सुगंधित तंबाखूची वाहतूक आणि विक्री करणारा तंबाखू माफिया तडीपार..

अवैध सुगंधित तंबाखूची वाहतूक आणि विक्री करणारा तंबाखू माफिया तडीपार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-अवैध सुगंधित तंबाखूची वाहतूक आणि विक्री करणाऱ्या एका तंबाखू माफियाला पोलिसांनी अखेर तडीपार केले.त्याला महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६(१)(अ)(ब) अंतर्गत चार महिन्यांसाठी नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.या कारवाईमुळे परिसरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
हरीश राजेश चमेडीया वय ३५ वर्षे,रा.भिवापूर,जि. नागपूर असे तडीपार करण्यात आलेल्या तंबाखू माफियाचे नाव आहे.हरीश हा गेल्या अनेक वर्षापासून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची बेकायदेशीर वाहतूक व विक्रीच्या गोरखधंद्यात सक्रिय होता.त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे नोंदले आहेत.पोलिसांनी त्याच्या गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाया केल्या,मात्र तरीही त्याच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झाली नाही.उलट,त्याची गुन्हेगारी पावले सातत्याने पुढेच पडत राहिल्याने परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.यामुळे भिवापूर पोलिसांनी उमरेड उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्फत उमरेडचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी (एसडीओ)यांच्याकडे हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता.प्रस्तावाची छाननी करून मंजूर करत अखेर पोलिसांनी त्याला जिल्ह्यातून तडीपार करण्यासाठी कंबर कसली आणि जिल्ह्यातून ‘गेट आउट’ केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!