Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोलीअवैध वाळू उत्खनन भोवले; तब्बल १ कोटीहून अधिकचा दंड.. - कुरखेडा तालुक्याच्या...

अवैध वाळू उत्खनन भोवले; तब्बल १ कोटीहून अधिकचा दंड.. – कुरखेडा तालुक्याच्या नान्ही रेती घाटातील प्रकरण.. – दंड वसुलीत प्रशासन कोमात तर जाणार नाही नां?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-कुरखेडा उपविभागांतर्गत येणाऱ्या नान्ही रेतीघाटात नियमांचे उल्लंघन करून अवैध वाळू उत्खनन झाल्याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी सहा सदस्यीय उच्चस्तरीय समितीची नियुक्ती करून सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.सन २०२५-२६ या वर्षासाठी कुरखेडा उपविभागातील नान्ही आणि कुंभीटोला या रेतीघाटांचा ई-लिलाव करण्यात आला होता.यामध्ये गोंदिया जिल्ह्याच्या देवरी येथील ‘तारामंगल एजन्सी’ यांनी सर्वोच्च बोली लावून हे रेतीघाट मिळवले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाने ११ डिसेंबर २०२५ रोजी यासंदर्भात मंजुरीचा आदेशही निर्गमित केला होता.परंतु, या आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले होते की,अटी व शर्तींचा करारनामा तसेच ईएमपी आणि सीईआर बाबतचे हमीपत्र सादर केल्यानंतरच प्रत्यक्ष उत्खननास सुरुवात करता येईल.तरीही,कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच नान्ही रेतीघाटातून अवैधरीत्या शेकडोच्यावर रेतीसाठा तहसीलदार कुरखेडा यांच्या अहवालातून समोर आले होते.त्यानुसार,प्रकरणाची पारदर्शक चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी समिती गठीत केली होती.समितीत अध्यक्ष-सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी गडचिरोली, सह-अध्यक्ष-सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी एटापल्ली,सदस्य-कार्यकारी अभियंता (सा.बां.विभाग),उपअधीक्षक(भूमी अभिलेख)आणि सहाय्यक जिल्हा खनिकर्म अधिकारी,सदस्य सचिव-तहसीलदार धानोरा यांना प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करून वस्तुनिष्ठ तपासणी करून आपला स्वयंस्पष्ट अभिप्राय सात दिवसांच्या आत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.त्यानुसार,नान्ही रेती घाटात अवैधरित्या ७८६ ब्रास रेतीसाठा आढळून आला.प्रकरणी देवरी येथील ‘तारामंगल एजन्सी’ला महसूल विभागाने दंड आकारणी केली आहे.एका ब्रास रेतीची किंमत ३ हजार ६०० रुपये,त्यावर प्रत्येक ब्रासला ५ पट दंड म्हणजेच एक ब्रास रेती १८ हजार रुपयांची व प्रतिब्रास वाहतूक परवाना(रॉयल्टी)६०० रुपये म्हणजेच एक ब्रास १८ हजार ६०० रुपयाची.म्हणजेच ७८६ ब्रास×१८,६००= १ कोटी ४६ लाख १९ हजार ६०० रुपयांचा एकूण दंड ‘तारामंगल एजन्सी’ ला ठोठावण्यात आला आहे.
महत्वाचे म्हणजे,सदरची ‘तारामंगल एजन्सी’ खरोखरच एवढा मोठा दंड भरणार काय?महसूल विभाग वसूल  करणार काय?नाहीतर प्रशासन कोमात तर जाणार नाही नां?अश्या चर्चांना उधाण आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष यांचा गडचिरोली दौरा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे उद्या,गुरुवार १० सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा...

कुलरमध्ये पाणी भरणे जीवावर बेतले; एकाचवेळी दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-कित्येकदा कुलर सुरू असतांना वा कुलरची बोर्डमध्ये लावलेली पिन न काढता कुलरमध्ये पाणी भरणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे.बऱ्याच नागरिकांना कुलरच्या विद्युत प्रवाहाचा...

ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारली ‘जनकल्याणम्’ अभ्यासिका.. – आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील उपक्रमाचे कौतुक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा गावातच उपलब्ध करून देण्यासाठी आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारलेली...

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!