Wednesday, August 26, 2026
Homeकुरखेडाअवैध रेती तस्कराकडून पत्रकारांना अश्लील शिवीगाळ प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल....- मुजोरी...

अवैध रेती तस्कराकडून पत्रकारांना अश्लील शिवीगाळ प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल….- मुजोरी येणार अंगलट; कुरखेडा तालुक्यातील प्रकरण…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके

कुरखेडा(गडचिरोली) :- गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात शासनाच्या अवैध गौण खनिजांची चोरी करणाऱ्या चोरट्यांविरोधात महसूल विभागाने कारवाईचा सपाटा लावताच; अवैधरीत्या रेती उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.अशातच लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ गणल्या जाणाऱ्या पत्रकारांना ‘चोरी तर चोरी वर शिणाजोरी’ करणारे बातमी प्रकाशित केली म्हणून अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याने आज १३ जून २०२३ रोजी कुरखेडा येथील स्थानिक पत्रकार संघाच्या वतीने पोलीस स्टेशन कूरखेडा येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कुरखेडा येथील तहसीलदार राजकुमार धनबाते व महसूल विभागाचे भरारी पथकाने शनिवारी १० जून २०२३ रोजी रात्री अवैध रेती वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टर वाहतूक दारांवर कारवाई केली.मात्र त्यातील एक ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पोबारा करून पळून गेला.याबाबत कुरखेडा येथील स्थानिक पत्रकारांनी वृत्त प्रकाशित केले होते.त्यानुसार गुंड प्रवृत्तीचा कुरखेडा शहरापासून काही अंतरावर असलेल्या कूंभीटोला येथील  देवानंद रेवनाथ नाकाडे याने कूंभीटोला येथील निवासी असलेल्या एका पत्रकाराच्या घरासमोर त्यांच्या घरातील महिला व अन्य पूरूष मंडळी उपस्थित असतांना अश्लील व अत्यंत खालच्या पातळीची शिवीगाळ पत्रकारांना उद्देशून केली असल्याने त्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार त्वरित कारवाई करावी; अशी तक्रार तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सिराज पठाण,सचिव नासीर हाश्मी,सह सचिव प्रा.विनोद नागपूरकर,सदस्य विजय भैसारे,महेन्द्र लाडे,कृष्णाजी चौधरी,ताहीर शेख, शिवा भोयर,चेतन गहाणे,सूरज गावतूरे यांनी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६(Special Intensive Revision-SIR)कार्यक्रमात सुधारणा केली असून,सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.त्यानुसार,येत्या ३१ ऑगस्ट २०२६...

राज्यातील सर्व शासकिय,खाजगी व धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिटसह संबंधित यंत्रणांचे ऑडिट करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देतांना रुग्णालयांची सुरक्षा प्राधान्याची बाब आहे.राज्यातील सर्व शासकीय,खासगी व धर्मदाय आरोग्य संस्थांमधील...

५ टक्के दिव्यांग कल्याण निधीचा शंभर टक्के विनियोग करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.. – नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर दिव्यांग कल्याणासाठी राखीव निधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवावा. प्रलंबित UDID नोंदणी व वैद्यकीय तपासणी प्रक्रिया...

अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार जमा होण्याचा मार्ग मोकळा..

उद्रेक न्युज वृत्त :-रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.महायुती सरकारने माहे-जुलै-२०२६ च्या हप्त्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!