- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्यात अवैध दारूविक्री आणि वाहतुकीविरोधात गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार नरेश मेश्राम व पोलीस कॉन्स्टेबल नितीन शेरकी यांच्या पथकाने पारडी फाटा रोडवर दोन वेगवेगळ्या कारवाया करत बेकायदेशीररित्या विनापरवाना देशी-विदेशी दारू आणि बिअरची वाहतूक करणाऱ्या ४ आरोपींना रंगेहात अटक केली आहे.या दोन्ही कारवायांमध्ये एकूण ३ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून,एकूण ५ आरोपींविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- पहिली कारवाई: मुडझा येथील दोन आरोपी गजाआड,मुख्य आरोपी फरार👇
गडचिरोली पोलीस पथक पेट्रोलिंगवर असतांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी मौजा-पारडी फाटा रोडवर सापळा रचला.यावेळी निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या एमएच ३३ एजे ०४७० आणि एम एच ३३ एएच ५८८० क्रमांकाच्या सुझुकी एक्सेस दुचाकीवरून अवैध दारूची वाहतूक करतांना विकास कवडु मेश्राम वय २६ वर्षे आणि अतुल दिवाकर मेश्राम वय २६ वर्षे, दोन्ही रा.मुडझा, जि.गडचिरोली यांना पंचांसमक्ष ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून रॉकेट देशी दारू संत्रा आणि रॉयल स्टॅग कंपनीच्या दारूच्या एकूण १४८ निपा(क्वार्टर)आणि दोन दुचाकींसह एकूण १ लाख ५२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पोलीस चौकशीदरम्यान हा दारूचा साठा सोनू व्यंकटेश गड्डमवार रा.मुडझा याच्या मालकीचा असल्याचे निष्पन्न झाल्याने,त्याच्यासह तिन्ही आरोपींवर कलम ६५(अ)महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.मुख्य आरोपी सोनू गड्डमवार सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
- दुसरी कारवाई: चंद्रपूर जिल्ह्यातील दोन तस्करांना अटक👇
काही वेळाने पारडी फाटा मार्गावर पोलिसांनी दुसरी यशस्वी कारवाई केली.सुझुकी एक्सेस दुचाकी (क्र.एमएच ३३ सीपी ९९१०)आणि एका विना क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या एक्सेस गाडीवरून (चेसीस क्र.एमबी८डीपी ११एजे८९५४७६०)दारूची वाहतूक करणाऱ्या रितीक जितेंद्र पिपरे वय २३ वर्षे व मुकेश मुर्लीधर रोहनकर वय २७ वर्षे,दोन्ही रा.वाघोली, ता.सावली,जि.चंद्रपूर यांना पोलिसांनी अडवून अटक केली.त्यांच्या ताब्यातून २०० नग रॉकेट देशी दारू संत्रा,तसेच हायवर्ड आणि बडवायझर मॅग्नम कंपनीचे एकूण ४८ बिअरचे टीन आणि दोन दुचाकींसह एकूण १ लाख ४९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या दोन्ही आरोपींविरुद्ध देखील गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अवैध दारू विक्रेत्यांचे दणाणले धाबे👇
सदर यशस्वी आणि कौतुकास्पद कारवाई गडचिरोली पोलीस स्टेशनचे पो.कॉ.नरेश मेश्राम आणि पो.कॉ. नितीन शेरकी यांच्या पथकाने पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.पोलिसांच्या या लागोपाठ झालेल्या धडक कारवायांमुळे जिल्ह्यातील अवैध दारू माफिया आणि तस्करांचे धाबे दणाणले आहेत. आगामी काळातही अशीच कडक कारवाई सुरू राहील,असा इशारा गडचिरोली पोलिसांनी दिला आहे.
- Advertisement -

