Friday, July 31, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअर्जित रजा मंजूर करण्यासाठी तीन हजाराची लाच; केंद्र प्रमुख अटकेत..

अर्जित रजा मंजूर करण्यासाठी तीन हजाराची लाच; केंद्र प्रमुख अटकेत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-अर्जित रजा मंजूर करण्यासाठी तीन हजाराची लाच स्विकरल्याप्रकरणी केंद्र प्रमुख शिक्षकास नांदेड लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज,सोमवार १६ फेब्रुवारीला सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास नांदेड जिल्ह्याच्या लोहा पंचायत समिती कार्यालयाच्या गट शिक्षणाधिकारी कार्यालयात रंगेहाथ अटक केली.दिगांबर रामचंद्र शिंदे,वय ५७ वर्षे,केंद्र प्रमुख शिक्षक(गट क),मूळ नेमणूक जिल्हा परिषद शाळा,रिसनगाव,ता.लोहा,जि.नांदेड सध्या नेमणूक गटशिक्षणाधिकारी कार्यालय,पंचायत समिती लोहा,जि.नांदेड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
प्रकरणातील तक्रारदार सन २०१८ पासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाद्रा,ता.लोहा,जि.नांदेड येथे प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. तक्रारदारांनी त्यांच्या खाजगी कारणास्तव ९ फेब्रुवारी २०२६ रोजी ४६ दिवसाची अर्जित रजा मंजूरीसाठी गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती कार्यालय लोहा, जि.नांदेड येथे अर्ज दिला होता.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रिसनगांव, ता.लोहा,जि.नांदेड येथील दिगांबर शिंदे,केंद्र प्रमुख हे पंचायत समिती लोहा कार्यालयाचे आस्थापना विभागामध्ये लिपिकाचे काम तसेच गटशिक्षणाधिकारी व्यवहारे यांचे सर्व कार्यालयीन कामे पाहतात.त्यामुळे तक्रारदार यांनी  ११ फेब्रुवारी रोजी त्यांची अर्जित रजा मंजूर झाली की नाही हे पाहण्यासाठी पंचायत समिती लोहा येथील कार्यालयात गेले व केंद्र प्रमुख शिंदे यांची भेट घेऊन त्यांना अर्जित रजा मंजुरी विषयी विचारणा केली.तेव्हा शिदे यांनी तक्रारदार यांना अर्जित रजा मंजूर करण्यासाठी स्वतःसाठी व गटशिक्षणाधिकारी व्यवहारे यांच्यासाठी ४ हजार रुपये द्यावे लागतील, पैसे दिले तरच तुमची अर्जित रजा मंजूर होईल,असे म्हणून तक्रारदार यांना लाचेची मागणी केली.त्यानुसार तक्रारदार यांनी १२ फेब्रुवारी रोजी नांदेडच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.
त्यानंतर,१३ फेब्रुवारी रोजी तक्रारदार यांना शासकीय पंचासह गटशिक्षणाधिकारी व्यवहारे यांची भेट घेण्यासाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालय,शिक्षण विभाग,पंचायत समिती कार्यालय लोहा येथे पाठविले असता,गटशिक्षणाधिकारी व्यवहारे यांनी तक्रारदार यांना,तुम्ही अगोदर मुख्याध्यापक पदाचा पदभार घेऊन टाका मग तुमची अर्जित रजा मंजूर करतो,असे सांगितले. तेव्हा तक्रारदार हे त्यांचे कार्यालयातून परत निघाले असता,त्यांचे पाठीमागे केंद्र प्रमुख दिगांबर शिंदे हे आले व तुमची अर्जित रजा मंजूर करायची असेल तर मला दोन-तीन हजार रुपये देऊन टाका असे म्हणून लाचेची मागणी केली.तेव्हा तक्रारदार यांनी केव्हा देऊ असे विचारले असता,केंद्र प्रमुख शिंदे यांनी उद्या द्या,परवा द्या,तुमच्या मनाने कधी पण द्या, असे म्हणून स्वतःसाठी ३ हजार रुपये लाचेची मागणी केली.त्यानुसार,आज सोमवार १६ फेब्रुवारी रोजी तक्रारदार यांना शासकीय पंचासह केंद्रप्रमुख दिगांबर शिंदे यांच्याकडे ३ हजार रुपये लाचेच्या रकमेसह गटशिक्षणाधिकारी कार्यालय, पंचायत समिती,लोहा येथे पाठविले.तेथे तक्रारदार यांनी केंद्रप्रमुख शिदि यांची भेट घेऊन तुम्ही म्हटल्याप्रमाणे ३ हजार रुपये आणले आहेत,असे सांगितले.तेव्हा केंद्रप्रमुख शिंदे यांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून तक्रारदार यांची अर्जित रजा मंजूर करून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून स्वतःसाठी ३ हजार रुपये लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले.
सदरची सापळा कारवाई संदीप पालवे,पोलीस अधीक्षक,अशोक कदम अप्पर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नांदेड परिक्षेत्र,नांदेड यांच्या मार्गदर्शनानुसार ला.प्र.वि.नांदेडचे पोलीस उप अधीक्षक प्रशांत पवार,पोलीस निरीक्षक अनिता चव्हाण व नांदेड युनिट पथक यांनी पार पाडली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जिल्हा परिषदांसह मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार एकाचवेळी होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ५० टक्के ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या तब्बल २२ जिल्हा परिषदांच्या निवडणूका अद्यापही रखडल्या आहेत.विशेष म्हणजे,ज्या ठिकाणी मर्यादा ओलांडल्या गेल्या...

बांधकाम कामगारांनो सावधान..! योजनांच्या नावाखाली कुणालाही पैसे देऊ नका- न्यू ह्यूमन राईट अँड फाईट रिसर्च फाउंडेशनचे आवाहन

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांच्या नावाखाली काही ठिकाणी एजंट,दलाल,मध्यस्थ किंवा इतर व्यक्तींमार्फत बांधकाम...

पुराचा तडाखा; तब्बल ७०० नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी जिल्हाधिकारी...

रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा  दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील मालेगाव टाऊन परिसरात आज,गुरुवार ३० जुलै रोजी सकाळच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!