Saturday, October 17, 2026
Homeदेसाईगंज..अन्यथा मका भरलेले ट्रॅक्टर घेऊन धडकणार तहसील कार्यालयात.. -देसाईगंज तालुक्यातील मका उत्पादक...

..अन्यथा मका भरलेले ट्रॅक्टर घेऊन धडकणार तहसील कार्यालयात.. -देसाईगंज तालुक्यातील मका उत्पादक शेतकरी आक्रमक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यातील मका उत्पादक शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात मका पिकाचे उत्पादन केले व उत्पादित केलेला माल शेतकरी आधारभुत खरेदी योजनेअंतर्गतच्या प्रक्रीयेनुसार ऑनलाइन नोंदणी करून काहींनी घरात तसेच परिस्थितीनुसार अंगणात साठवणूक करून ठेवला.मात्र, अद्यापही मका खरेदीची शासकीय केंद्रे सुरू न झाल्याने आज,मंगळवार १२ मे रोजी तालुक्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांनी देसाईगंजच्या तहसीलदार प्रीती डुडुलकर यांना निवेदन सादर करून तात्काळ मका खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी केली आहे.त्याचबरोबर,जर कां येत्या दोन दिवसांत मका खरेदी केंद्रे सुरू न झाल्यास मका भरलेले ट्रॅक्टर घेऊन तहसील कार्यालयावर धडक देण्यात येईल,असाही इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
शेतकरी आधारभुत खरेदी योजनेअंतर्गत देसाईगंज तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली,पण महामंडळ खरेदीची चातक पक्ष्याप्रमाणे वाट पाहत बसलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.शासनाच्या उदासीन धोरणामुळे मका खरेदी संदर्भात कोणतीही कार्यवाही दिसून येत नसल्यामुळे मका उत्पादक शेतकरी आर्थीक कोंडीत तसेच निसर्गचक्राच्या कचाट्यात सापडले आहेत.त्यामुळे, अवकाळी पावसाचा धोका तसेच ठरवुन दिलेल्या लक्षांक मर्यादेमुळे संपूर्ण शेतकऱ्यांचा माल खरेदी न होण्याची भिती शेतकऱ्यांच्या मनात घर करून बसल्याने आम्ही तुमच्या दालनात येऊन निवेदन सादर करीत आहोत, निवेदन सादर करूनही यावर ठोस निर्णय न झाल्यास येत्या दोन दिवसांत मका भरलेले ट्रॅक्टर घेऊन तहसील कार्यालयात दाखल होऊ,असे मका उत्पादक शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदन सादरकरतेवेळी शेतकरी नितीन बन्सोड,रमेश कुथे,संदीप डोंगरवार,मनोज बन्सोड,संजय अवसरे, माणिक बन्सोड,प्रमोद कापगते,शांताबाई कापगते यांचेसह तालुक्यातील मका उत्पादक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विविध शिष्यवृत्तीसाठी एनएसपी व महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नोंदणीचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील अर्ज केंद्र शासनाच्या राष्ट्रीय...

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!